Crime: लष्कराचा गणवेश विकणाऱ्या व्यक्तिला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक

पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याचा पोलिसांचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

143
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरीतील ३० जणांवर 'मोक्का'

राजस्थानमध्ये एका व्यक्तिला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या व्यक्तिने चक्क लष्कराचाच गणवेश विकला होता. पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करत असल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. (Crime)

आनंदराज सिंग (२२) असे या व्यक्तीचे नाव आहे. तो राजस्थानच्या गंगानगर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची महिती समोर आली आहे. आनंदराज लष्कराचे गणवेश विकण्याचा व्यवसाय करत होता, मात्र मागील काही दिवसांपासून पोलिसांना त्याचा संशय आला. त्यामुळे त्याची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.

(हेही वाचा – Sunetra Gupta : कोविड-१९ सारख्या संक्रमणावर संशोधन करणाऱ्या सुनेत्रा गुप्ता)

राजस्थानच्या गंगानगर जिल्ह्यातील सूरतगड आर्मी कॅन्टोन्मेंटच्याबाहेर आनंदराज सिंग गणवेशाचे दुकान चालवत असे. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या ३ महिलांच्या सतत संपर्कात आला. त्यावेळी त्याने लष्करासंदर्भातील महत्त्वाची माहिती गोळा करून सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या ३ महिलांना दिल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी आनंदराज सिंगला अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत. अतिरिक्त पोलीस महासंचालक (गुप्तचर विभाग) संजय अग्रवाल यांनी या प्रकरणाबाबत म्हणाले की, ‘आनंद राज सिंग (२२) हा सूरतगड आर्मी कॅन्टोन्मेंटच्या बाहेर गणवेशाचे दुकान चालवत असे, मात्र काही दिवसांपासून तो आपले दुकान बंद करून बाहेर एका कारखान्यात कामाला लागला होता. या काळात तो पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांशी संबंधित महिलांच्या संपर्कात आला होता. आनंदराज सिंग हा त्याच्या स्रोतांकडून लष्कराची गोपनीय माहिती मिळवायचा. यानंतर ती माहिती पाकिस्तानच्या गुप्तहेरांना सांगायचा. गोपनीय माहिती पाठवण्यासाठी आरोपीने पैशांची मागणीही केली होती’, असे संजय अग्रवाल यांनी सांगितले.

दरम्यान, अशा प्रकारच्या हेरगिरीच्या कारवायांवर राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर विभागाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (गुप्तचर विभाग) संजय अग्रवाल यांनी सांगितले. ”आनंदराज सिंग या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्यानंतर सर्व सुरक्षा यंत्रणांच्या संयुक्त चौकशीतून तांत्रिक माहिती मिळवण्यात आली. यानंतर त्याने वापरलेल्या मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली”, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.