Rohit Pawar : एमआयडीसीची मागणी करणाऱ्या आमदार रोहित पवारांच्या निर्णयाला गावातूनच होतोय विरोध

94
Rohit Pawar : एमआयडीसीची मागणी करणाऱ्या आमदार रोहित पवारांच्या निर्णयाला गावातूनच होतोय विरोध

कर्जत तालुक्यातील पाटेगाव – खंडाळ्यात एमआयडीसी (Rohit Pawar) सुरू करण्याच्या मागणीने जोर धरला असताना, पाटेगावमध्ये झालेल्या ग्रामसभेत मात्र ८० टक्के उपस्थित ग्रामस्थांनी एमआयडीसीला विरोध केला आहे. तर उर्वरित लोकांनी जाचक अटी घालून परवानगी देण्यास हरकत नसल्याचे मत मांडले आहे.

कर्जत -जामखेड मतदारसंघाच्या मध्यवर्ती खंडाळा पाटेगावमध्ये एमआयडीसी सुरू व्हावी, यासाठी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रयत्न करत जोरदार रणनीती आखली. या भागाची पाहणीही महविकास आघाडी काळात पूर्ण केल्याचे सांगत फक्त अधिसूचना काढायची बाकी असून,ती त्वरित काढावी, अशी मागणी करत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. तर पावसात आंदोलनही केले. याच वेळी आमदार प्रा. राम शिंदे यांनी मतदारसंघात एमआयडीसी झालीच पाहिजे, अशी भूमिका विधानपरिषदेत मांडताना, यासाठी आपल्या कार्यकाळात आपण पाठपुरावा केला होता, असे म्हणत सध्या मात्र नीरव मोदींसह इतर धनिकांच्या जमिनीसाठी एमआयडीसी करायची आहे काय? असा प्रश्न उपस्थित करत या विषयात ट्विस्ट आणला.

(हेही वाचा – Independence Day 2023 : लाल किल्ल्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण भाषण)

यावर दोन्ही बाजूने उलट सुलट चर्चा, आरोप प्रत्यारोप आंदोलने, असे बरेच काही सुरू असताना पाटेगावमध्ये (Rohit Pawar) ग्रामसभा झाली. सरपंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कैलास शेवाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हर्षल शेवाळे यांच्या उपस्थितीत या वेळी अनेक नागरिकांनी आमची बागायती शेती जात असल्याने विरोध केला तर एमआयडीसीमध्ये (Rohit Pawar) होत असलेल्या प्रदूषणामुळे गावाला धोका निर्माण होतो, असे मत व्यक्त केले गेले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.