India Migration Policy : देशातील कुशल तंत्रज्ञांना परदेशात संधी मिळावी यासाठी केंद्र सरकार करणार युरोपीयन देशांशी करार

युकेबरोबर अलीकडेच झालेला करार हा ‘इंडियाज् यंग प्रोफेशनल्स स्कीम’ या नावाने ओळखला जातो

103
India Migration Policy : देशातील कुशल तंत्रज्ञांना परदेशात संधी मिळावी यासाठी केंद्र सरकार करणार युरोपीयन देशांशी करार
India Migration Policy : देशातील कुशल तंत्रज्ञांना परदेशात संधी मिळावी यासाठी केंद्र सरकार करणार युरोपीयन देशांशी करार
  • ऋजुता लुकतुके

देशातील कुशल कामगारांना देशाबाहेर नोकरीची संधी मिळावी यासाठी युरोपीयन देशांबरोबर करार करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. आणि हे काम अंतिम टप्प्यात आल्याचं बोललं जातंय. जगभरात मोठी मागणी असलेल्या माहिती-तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा क्षेत्रातील कुशल भारतीय कामगारांना युरोपीय देशांमध्ये नोकरीचा अनुभव मिळावा, तिथं काम करणं सोपं जावं यासाठी केंद्र सरकार काही युरोपीयन देशांची करार करत आहे. युके, जर्मनी, पोर्तुगाल आणि ऑस्ट्रेलिया या देशांबरोबर असे करार पूर्वी झालेलेही आहेत.

आता स्वित्झर्लंड आणि आणखी काही देशांबरोबरच वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या आहेत. भारतीयांना परदेशात राहण्याची, काम करण्याची तसंच तिथला व्यावसायिक अनुभव घेण्याची संधी मिळावी यासाठी हे पाऊल केंद्र सरकारने उचललं आहे. युकेबरोबर अलीकडेच झालेला करार हा ‘इंडियाज् यंग प्रोफेशनल्स स्कीम’ या नावाने ओळखला जातो. या अंतर्गत, कारकीर्दीच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात असलेले दोन्ही देशांचे नागरिक दोन वर्षांसाठी एकमेकांच्या देशात जाऊन काम करू शकतात. यासाठी वयोमर्यादा आहे १८ ते ३६ वर्षं. तर एकावेळी जास्तीत जास्त ३००० लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

(हेही वाचा – Kareena Shaikh : पूर्व उपनगरातील गुन्हेगारांची ‘गॉडमदर’ करीना शेखवर गुन्हा दाखल)

भारतीय मुलांनी जर्मनीत शिक्षण घेतलेलं असेल तर ते संपल्यावर १८ महिन्यांनंतर जर्मनीतच नोकरी शोधण्याची मुभा त्यांना या कराराअंतर्गत मिळते. तसंच तुम्ही भारतात घेतलेलं शिक्षण किंवा अभ्यासक्रम जर्मन विद्यापीठाने प्रमाणित केलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांना जर्मनीत ‘एक्सचेंज प्रोग्राम’ अंतर्गत काम करता येतं. पोर्तुगालमध्येही भारतीयांना नोकरी शोधणं सोपं जाणार आहे. सध्या ज्या देशांबरोबर करारावर चर्चा सुरू आहे ते देश आहेत इटली, डेन्मार्क आणि ग्रीस. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान ऑस्ट्रेलियाबरोबरही असाच करार करण्यात आला होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.