Haryana Legislative Assembly : काँग्रेसचे पानीपत करण्यासाठी आप हरियाणाच्या मैदानात

इंडिया आघाडतील पक्षांचा समझोता हा लोकसभेच्या निवडणुकीसाठी झाला आहे.

108
Haryana Legislative Assembly : काँग्रेसचे पानीपत करण्यासाठी आप हरियाणाच्या मैदानात
Haryana Legislative Assembly : काँग्रेसचे पानीपत करण्यासाठी आप हरियाणाच्या मैदानात

केंद्र सरकारचा अध्यादेश हाणून पाडण्यासाठी लोटांगण घालणारा आम आदमी पक्ष आता काँग्रेसलाच संपविण्यासाठी उताविळ झाला आहे. हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण जागा स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा आप ने केली आहे. यामुळे आप हा विश्वास ठेवण्यासारखा पक्ष नाही, अशी चर्चा काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे.

आम आदमी पक्ष विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ नावाच्या आघाडीत सामील असला तरी आप ने हरियाणात काँग्रेसला डावलून विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. इंडिया आघाडतील पक्षांचा समझोता हा लोकसभेच्या निवडणुकीसाठी झाला आहे. यामुळे विधानसभेची निवडणूक प्रत्येक पक्ष स्वतंत्ररित्या किंवा आघाडी करून लढणार आहे. दरम्यान, आपने हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत सर्व जागा स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यामुळे काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

(हेही वाचा – Ganeshotsav : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आवाहन)

केंद्र सरकारने दिल्लीतील प्रशासनावर नियंत्रण मिळविण्यासाठी काढलेला अध्यादेश राज्यसभेत हाणून पाडावा, अशी विनंती काँग्रेससह इंडियातील तमाम घटक पक्षांना केली होती. काँग्रेस पाठिंबा देणार नाही तोपर्यंत इंडियाच्या बैठकीत सामील होणार नाही, अशी आडमुठी भूमिका केजरीवाल यांनी घेतली होती. काँग्रेसने आपला समर्थन देत राज्यसभेत अध्यादेशाच्या विरोधात मतदान केले होते. परंतु, आता तोच आम आदमी पक्ष हरियाणात काँग्रेसच्या विरोधात उभा झाला आहे. आप चे राज्यसभेचे खासदार संदीप पाठक म्हणाले की, आप विधानसभेच्या सर्व ९० जागा स्वबळावर लढवणार आहे.

हरियाणात आप आणि काँग्रेसमध्ये नंबर दोनचा पक्ष होण्यासाठी शर्यत लागली आहे. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होऊन काँग्रेसला तिसऱ्या क्रमांकावर ढकलण्यासाठी आपने रणनिती आखायला सुरुवात केली आहे. आप ने ‘परिवार जोडो’ मोहीम राबविण्याची घोषणा केली असून यासाठी येत्या १५ दिवसांत प्रत्येक गावात २१ सदस्यांची समिती स्थापन केली जाणार आहे. येत्या काळात आप हरियाणातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असेल, असा दावा पाठक यांनी केला आहे. महत्वाचे म्हणजे, आम आदमी पक्षानेच पंजाबमध्ये काँग्रेसला नामशेष करून सोडले आहे. आता हरियाणामुळे सुध्दा काँग्रेसचे पानीपत करण्यासाठी आप सरसावला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.