Jansuraksha Vidheyak : विरोधी पक्षांच्या प्रचंड मोर्च्याला गर्दी किती ?; उबाठाच्या बालेकिल्ल्यातच झाले हसे

194

राज्य सरकारनं विधानसभेत जनसुरक्षा कायदा (Jansuraksha Vidheyak) मंजूर केला. मात्र त्याला अनेक राजकीय पक्ष विरोध करत आहेत. या कायद्यामुळे लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा कांगावा करत इंडि आघाडीकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवरही (Shivaji Park) उबाठा गटाकडून आंदोलन करण्यात आले. राज्यव्यापी म्हणवणाऱ्या या आंदोलनासाठी मविआतील तीनही घटकपक्षांनी जोर लावूनही अवघी ३००-४०० लोकं जमवण्यात उबाठाला यश आले. भाकप, माकप हेही या आंदोलनात सहभागी झाले होते.

(हेही वाचा – PM Narendra Modi करणार उत्तर प्रदेश, उत्तराखंडचा दौरा; पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याची शक्यता)

दादर, माहिम, शिवाजी पार्क हा एकेकाळी शिवसेनेचा (UBT Sena) बालेकिल्ला होता. आजही उबाठाचे महेश सावंत येथील आमदार आहेत, तर अनिल देसाई येथील स्थानिक खासदार आहेत. असे असूनही या आंदोलनाला अवघी ३००-४०० लोकं जमणं, हे उबाठाने स्वतःचेच हसे करून घेण्याप्रमाणे असल्याची प्रतिक्रिया सामाजिक माध्यमांतून व्यक्त करण्यात येत आहे. आलेल्या गर्दीतही मुसलमानांची संख्याच अधिक असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

अत्यंत हास्यास्पद म्हणजे या वेळी आंदोलकांनी जनसुरक्षा कायदा विधेयक रद्द झालेच पाहिजे, जनसुरक्षा कायद्याचा निषेध, निषेध, निषेध असे लिहिलेली हस्तपत्रके जाळली. स्वतःच करत असलेल्या मागणीची पत्रके जाळल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे. (Jansuraksha Vidheyak)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.