Swami Prasad Maurya यांना ‘ते’ विधान भोवले; गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाने दिले आदेश

स्वामी प्रसाद मौर्य यांनी यापूर्वीही एक्सवरून हिंदू आणि सनातनाच्या धार्मिक भावना भडकवणाऱ्या अनेक पोस्ट केल्या आहेत. या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर, न्यायदंडाधिकारी अंब्रीश कुमार श्रीवास्तव यांनी वजीरगंज पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून निवेदन मागवले होते.

158
Swami Prasad Maurya यांना 'ते' विधान भोवले; गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाने दिले आदेश

उत्तर प्रदेश सरकारने माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांच्याविरोधात लक्ष्मी देवीबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने वजीरगंज पोलीस ठाण्याच्या प्रभारीला संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्याचे आणि एफआयआरची प्रत सात दिवसांच्या आत न्यायालयात पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.

(हेही वाचा – PM Narendra Modi : “मी तर २०४७ ची तयारी करतोय” – पंतप्रधान मोदींचं सूचक विधान)

देवी लक्ष्मीवर आक्षेपार्ह टिप्पणी :

वकील रागिनी रस्तोगी यांनी न्यायालयात कलम 156 (3) अंतर्गत याचिका दाखल केली होती. त्यात म्हटले आहे की, १५ नोव्हेंबर २०२३ रोजी एका वृत्तपत्राने समाजवादी पक्षाचे माजी सरचिटणीस किंवा माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांची बातमी प्रकाशित केली. त्यात स्वामी प्रसाद मौर्य यांनी देवी लक्ष्मीवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.

(हेही वाचा – Delhi Liquor Policy Scam Case : के. कविता यांना ७ दिवसांची ईडी कोठडी)

सतत हिंदू आणि सनातनाच्या धार्मिक भावना भडकवणाऱ्या पोस्ट :

स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी यापूर्वीही एक्सवरून हिंदू आणि सनातनाच्या धार्मिक भावना भडकवणाऱ्या अनेक पोस्ट केल्या आहेत. या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर, न्यायदंडाधिकारी अंब्रीश कुमार श्रीवास्तव यांनी वजीरगंज पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून निवेदन मागवले होते.

नेमकं प्रकरण काय ?

१२ नोव्हेंबर २०२३ रोजी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी त्यांच्या पत्नीची पूजा करून काही फोटो एक्सवर शेअर केले . तसेच हे फोटो शेअर करताना त्यांनी देवी लक्ष्मीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

(हेही वाचा – Achinta Sheuli Controversy : मध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये दिसला स्टार खेळाडू; ऑलंम्पिकला जाण्याचं स्वप्न भंगलं)

स्वामी प्रसाद मौर्य यांनी एक्सवर लिहिलं होतं की,

“दीपोत्सवानिमित्त मी माझ्या पत्नीची पूजा आणि तिचा सन्मान केला. जगातल्या कुठल्याही धर्मात, जातीत, वंश, रंग अथवा देशात जन्मलेल्या मुलाला दोन हात, दोन पाय, दोन कान, दोन डोळे आणि दोन छिद्र असलेलं नाक, एक डोकं, एक पोट आणि एक पाठ असते. परंतु, चार हात, आठ हात, दहा हात, वीस हात, हजार हात असलेलं मूल अद्याप या जगात जन्माला आलेलं नाही. मग चार हात असलेली लक्ष्मी कशी जन्माला येऊ शकते? तुम्हाला लक्ष्मीची पूजा करायची असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीची पूजा करा, तिचा आदर करा. ” (Swami Prasad Maurya)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.