EVM ला ‘सर्वोच्च’ क्लीन चिट…VVPAT संबंधी सर्व याचिका फेटाळल्या

सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम व्हीव्हीपॅटबाबत निकाल दिला आहे. तसेच बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची याचिका फेटाळली आहे. VVPAT पडताळणीची मागणी करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळल्या. कोर्टाचा या निर्णयामुळे निवडणूक आयोगाला मोठा दिलासा मिळाला आहे.

104
EVM ला 'सर्वोच्च' क्लीन चिट...VVPAT संबंधी सर्व याचिका फेटाळल्या

देशभरात लोकसभा निवडणूक २०२४ च्या (Lok Sabha Election 2024)  दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असून, अशातच सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ईव्हीएम व्हीव्हीपॅटबाबत (EVM VVPAT) महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. तसेच बॅलेट पेपरवर मतदान (Voting on ballot paper) घेण्यासंबंधीचे आणि VVPAT पडताळणीची मागणी करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे व्हीव्हीपॅट स्लिपसह ईव्हीएमद्वारे १०० टक्के मते जुळवण्याच्या मागणीला मोठा धक्का बसला आहे. (EVM)

काय दिला निकाल?

न्या. संजीव खन्ना (Justice Sanjeev Khanna) आणि न्या. दीपांकर (Justice Dipankar) यांच्या खंडपीठाने यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकांवर निर्णय दिला आहे. त्यात ईव्हीएमशी व्हीव्हीपॅट स्लिप १०० टक्के जुळण्याची मागणी केली होती. ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटीमध्ये कोणतीही छेडछाड शक्य नाही, असे निवडणूक आयोगाने खंडपीठाला सांगितले होते. आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला मशीन्सची सुरक्षा, त्यांचे सील करणे आणि त्यांच्या प्रोग्रामिंगबद्दल देखील माहिती दिली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायलयाने हा निर्णय दिला आहे. (EVM)

सर्वोच्च न्यायलय काय म्हणाले?

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात म्हटले आहे की, VVPAT स्लिप ४५ दिवस सुरक्षित राहील. या स्लिप उमेदवारांच्या स्वाक्षरीने सुरक्षित ठेवल्या जातील. निवडणुकीनंतर ईव्हीएम युनिट्सही सील करून सुरक्षित ठेवावे. निकाल जाहीर झाल्यानंतर तांत्रिक पथकाकडून ईव्हीएमची सूक्ष्म तपासणी करण्याचा पर्याय उमेदवारांकडे असणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर सात दिवसांत उमेदवारास असे करता येणार आहे. (EVM)

‘सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयामुळे विरोधकांना चपराक बसली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व याचिका फेटाळून लावल्याने लोकशाहीला हानी पोहोचवणाऱ्या अशा याचिकांना काही अर्थ नसल्याचे सिद्ध झाले आहे. बॅलेट पेपर आणि मतदान केंद्र लुटणाऱ्या लोकांना मोठा धक्का आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केली. (EVM)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.