Sunil Tatkare meet Sharad Pawar : तटकरे थेट ‘सिल्व्हर ओक’वर; बंद दाराआड काय घडलं? 

79
Sunil Tatkare meets Sharad Pawar at Silver Oak residence.
Sunil Tatkare meet Sharad Pawar : तटकरे थेट 'सिल्व्हर ओक'वर; बंद दाराआड काय घडलं? 
  • ​प्रतिनिधी

Sunil Tatkare meet Sharad Pawar            ​राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादाची धग कायम असतानाच, मंगळवारी मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी झालेल्या एका अनपेक्षित भेटीने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी अचानक शरद पवार यांची भेट घेतल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. पक्षातील फुटीनंतर तटकरे यांनी अशा प्रकारे पवारांची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ असल्याने या भेटीमागे नेमके काय दडले आहे, याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. (Sunil Tatkare meet Sharad Pawar)

(हेही वाचा – Mumbai Firing Case : मुंबई पुन्हा गोळीबाराने हादरली; भायखळ्यात तरुणावर भररस्त्यात फायरिंग, परिसरात खळबळ)

​निवडणूक आयोगाला पाठवलेली पत्रे आणि पक्ष विलीनीकरणाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असली, तरी तटकरे यांनी याला केवळ ‘सौजन्य भेट’ असल्याचे म्हटले आहे. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना तटकरे म्हणाले की, “शरद पवार साहेबांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती. केवळ त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी ही वेळ मागितली होती. यात कोणताही राजकीय हेतू किंवा राजकारण नाही.” (Sunil Tatkare meet Sharad Pawar)

(हेही वाचा – Devusinh Chauhan: स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला माजी केंद्रीय मंत्री देवसिंह चौहान यांची सदिच्छा भेट)

​तटकरे यांनी या भेटीला वैयक्तिक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला असला, तरी राजकीय विश्लेषकांच्या मते या भेटीचे ‘टायमिंग’ बरेच काही सांगून जाणारे आहे. एकीकडे अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या भवितव्यावरून चर्चा सुरू असताना, विलीनीकरणाला तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा विरोध असल्याच्या बातम्या येत आहेत. अशा गंभीर वातावरणात तटकरे यांनी थेट शरद पवारांच्या निवासस्थानी धाव घेतल्याने, पडद्यामागे काही नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव तर सुरू नाही ना, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. ही केवळ तब्येतीची विचारपूस होती की आगामी राजकीय भूकंपाची नांदी, हे येणारा काळच ठरवेल. (Sunil Tatkare meet Sharad Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.