Sunil Kedar : सुनिल केदार यांची आमदारकी रद्द 

230
Sunil Kedar : सुनिल केदार यांची आमदारकी रद्द 
Sunil Kedar : सुनिल केदार यांची आमदारकी रद्द 
काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनिल केदार (Sunil  Kedar) यांची आमदारकी रद्द करण्यात आले असून तसे आदेश आज महाराष्ट्र विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे यांनी काढले. 
 
दोन दिवसापूर्वी अटक
केदार यांना नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी विशेष न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. दोन दिवसांपूर्वी त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांची रवानगी जेलमध्ये झाली. मात्र रात्री उशिरा त्यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.(हेही वाचा-Crime: धाराशिवमध्ये २ कोटींचा दरोडा, बंदुकीचा धाक दाखवून बँक कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले)

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आमदारकी रद्द
सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार एखादया लोकप्रतिनिधीला दोन वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी कारावासाची शिक्षा झाल्यास त्यांची आमदारकी वा खासदारकी रद्द होते. त्यानुसार केदार यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली होती.
आदेश जारी 
आज यावर निर्णय झाला आणि केदार यांना आमदारकी गमवावी लागली. शिक्षा झाल्यापासून म्हणजेच २२ डिसेंबरपासून त्यांची आमदारकी रद्द झाल्याचे आदेश विधिमंडळ सचिवांनी आज काढले.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=nFSIUpIj8N0

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.