Sudhir Mungantiwar : ब्रिटनवरून परतल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांचे असे झाले स्वागत

174
Sudhir Mungantiwar : ब्रिटनवरून परतल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांचे असे झाले स्वागत

महाराजांच्या वाघनखांना भारतात आणण्यासाठी ब्रिटन सरकारसोबत करार झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) प्रथमच शनिवार १४ ऑक्टोबर रोजी चंद्रपुरात दाखल झाले. त्यानिमित्ताने त्यांचा जाहीर सत्कार व अभिनंदनाचा सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी “अभी तो सिर्फ झाकी है… अभी पुरा काम बाकी है,” असं म्हणत त्यांनी अनुपम पुढच्या कामासाठी सज्ज असल्याचे सांगितले.

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

“मी भाजपचे काम करत इथवर पोहोचलो. पक्षाने जे दिले ते आनंदाने स्वीकारले. प्रदेशाध्यक्ष झालो, मंत्री झालो. पण पदासाठी नेत्यांना कधीच भेटलो नाही. पक्षाने मला सांस्कृतिक कार्य विभाग दिल्याचा खूप आनंद आहे. त्यामुळे आज अनेक निर्णय करता येत आहे. मात्र एवढ्यावर काम थांबलेले नाही. अजून महाराष्ट्रात जगातील सर्वांत सुंदर असे संग्रहालय करण्याचा विचार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंब तलवारही भारतात आणायची आहे. अभी तो सिर्फ झाकी है… अभी पुरा काम बाकी है,” असा निर्धार राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री (Sudhir Mungantiwar) सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाल्यापासून तर चंद्रपूरला येईपर्यंत नागपूर, जाम, वरोरा, भद्रावती, पडोली आदी ठिकाणी नागरिकांनी जल्लोष केला. अनेकांनी मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर चंद्रपुरात भव्य स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा महानगर अध्यक्ष राहुल पावडे, चंदन सिंग चंदेल, देवराव भोंगळे, माजी आ. अतुल देशकर,संजय धोटे, सुदर्शन निमकर आणि अनेक सामाजिक संस्थांनचे पदाधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा – Navratri 2023 : नवरात्रीत प्रवास करतांना चिंता करू नका, भारतीय रेल्वेने केली ही ‘खास’ सोय)

चंद्रपूर येथील विश्रामगृहात जिल्हाधिकारी विनय गौडा,पोलिस अधीक्षक रवींद्र परदेशी, जी. प .मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपविभागीय अधिकारी मुरुगनंथम यांनी स्वागत केले. (Sudhir Mungantiwar)

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अत्याचारी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे ब्रिटनवरून भारतात आणण्यासाठी तेथील संग्रहालयासोबत सामंजस्य करार झाला आहे. माझ्यासाठी हा साधा करार नसून हे ईश्वरीय कार्य आहे, अशी भावना मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.