Navratri 2023 : नवरात्रीत प्रवास करतांना चिंता करू नका, भारतीय रेल्वेने केली ही ‘खास’ सोय

142
Navratri 2023 : नवरात्रीत प्रवास करतांना चिंता करू नका, भारतीय रेल्वेने केली ही 'खास' सोय

आजपासून म्हणजेच रविवार १५ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला (Navratri 2023) सुरुवात झाली आहे. अशातच भारतीय रेल्वेकडून प्रवाशांसाठी विशेष सुविधा पुरवल्या जात आहेत. या नवरात्रीच्या काळात रेल्वेने प्रवाशांना उपवासाची स्पेशल थाळी देण्याचा निर्णय घेतला आहे.

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) नवरात्रीसाठी (Navratri 2023) खास जेवणाची घोषणा केली आहे. त्याला ‘व्रत का खाना’ असं नाव देण्यात आलं आहे.हा त्यांच्या ई-केटरिंग मेनूचा भाग आहे. आय. आर. सी. टी. सी. ने देखील आपला स्पेशल मेनू जारी केला आहे. व्रत का खाना या स्पेशल थाळीची सुरुवात १२ ऑक्टोबर पासून झाली असून एकूण ९६ स्थानकांवर ही थाळी उपलब्ध आहे.

आय. आर. सी. टी. सी. च्या प्रसिद्धीपत्रकानुसार, उपवासाच्या थाळीत (Navratri 2023) सात्विक आहार असेल. मेनूबद्दल बोलायचे झाल्यास, या थाळीत साबुदाणा आहार जसे साबुदाणा खिचडी, नवरात्री थाळी, जीरा आलू, फ्रेंच फ्राईज, साबुदाणा वडा, फराळी चिवडा, मलाई बर्फी, रसमलाई, दूध, बर्फी, लस्सी, दही इत्यादीचा समावेश असेल.

(हेही वाचा – IND vs PAK World Cup : तिरंगा उंच लहरत आहे; अमित शहा यांनी केले भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन)

आयआरसीटीसीने पुढे दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रीची थाळी (Navratri 2023) सुमारे ९६ स्थानकांवर उपलब्ध असेल. या स्थानकांमध्ये नवी दिल्ली, कानपूर सेंट्रल, जबलपूर, रतलाम, जयपूर, पाटणा, राजेंद्र नगर, अंबाला कॅन्ट, झाशी, औरंगाबाद, अकोला, इटारसी, वसई रोड, नाशिक रोड, जबलपूर, सुरत, कल्याण, बोरीवली, दुर्ग, ग्वाल्हेर, मथुरा, नागपूर, भोपाळ आणि अहमदनगर यांचा समावेश आहे. आयआरसीटीसीच्या ई-केटरिंग वेबसाइटवर www.ecatering.irctc.co.in वर प्री-ऑर्डर करून प्रवासी या सेवांचा लाभ घेऊ शकतात.

तुम्ही फूड ऑन ट्रॅक अॅपद्वारेही नवरात्री थाळीची पूर्व-मागणी करू शकता. प्रवासी प्रवास सुरू होण्याच्या दोन तास आधी त्यांची ऑर्डर बुक करू शकतात. यासाठी तुम्हाला वैध पीएनआरची आवश्यकता असेल. याशिवाय, आयआरसीटीसीच्या (Navratri 2023) म्हणण्यानुसार, प्रवासी प्री-पे किंवा पे-ऑन-डिलिव्हरीचा पर्याय देखील निवडू शकतात.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.