Israel Hamas War : असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा घेतला आतंकवाद्यांचा कैवार; पंतप्रधानांकडे केली ‘ही’ मागणी

हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गाझातील लोकांशी जवळीक दाखवून मदत करण्याचे आवाहन केले आहे. यादरम्यान त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची युद्धअपराधी असे म्हणून हेटाळणी केली आहे.

71
Israel Hamas War : असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा घेतला आतंकवाद्यांचा कैवार; पंतप्रधानांकडे केली 'ही' मागणी
Israel Hamas War : असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा घेतला आतंकवाद्यांचा कैवार; पंतप्रधानांकडे केली 'ही' मागणी

हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता, त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायली सैन्याने गाझा पट्टीवर हल्ला केला आहे. (Israel Hamas War) गाझामध्ये 2200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ओलिसांची सुटका केल्याशिवाय गाझा पट्टीला वीज, पाणी आणि अन्नपुरवठा केला जाणार नाही, अशी धमकी इस्रायलने हमासला दिली आहे. दरम्यान, हैदराबादचे खासदार आणि AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गाझामधील लोकांशी जवळीक दाखवून मदत करण्याचे आवाहन केले आहे. हैद्राबादमधील अंबरपेट येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना ओवैसी यांनी बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर आरोप केले आहेत. (Israel Hamas War)

(हेही वाचा – Jammu Kashmir : हिंदूंनो, परिसर सोडा; नाहीतर किंमत चुकवावी लागेल; जम्मू-काश्मीरमधील हिंदू पुन्हा का झाले भयभीत)

बेंजामिन नेतन्याहू हे सैतान आणि युद्ध गुन्हेगार आहेत. मी पंतप्रधान मोदींना गाझातील लोकांशी एकजूट दाखवण्याचे आवाहन करतो. ओवैसी यांनी गाझातील लोकांचे समर्थन केले आहे. ‘गाझातील शूर लोक चिरंजीव होवो. भारताने मदत करावी’, असे ते म्हणाले.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्यावरही करताना ओवैसी यांनी टीका केली. ओवैसी बरळले की, आमच्या देशात एका बाबा मुख्यमंत्री म्हणाले की, पॅलेस्टाईनचे नाव घेतल्यावर गुन्हा दाखल केला जाईल. ते म्हणाले, ऐका बाबा मुख्यमंत्री, मी अभिमानाने तिरंगा ध्वजासह पॅलेस्टाईनचा झेंडा परिधान करून आलो आहे. मी पॅलेस्टाईनच्या पाठीशी उभा आहे. (Israel Hamas War)

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा आज 9 वा दिवस आहे. 7 ऑक्टोबर रोजी पॅलेस्टाईन शस्त्रास्त्र समूह हमासने गाझा पट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरू केले. हमासने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली असून याला इस्रायलविरुद्धची लष्करी कारवाई म्हटले आहे. हमासने सुमारे 20 मिनिटांत गाझा पट्टीतून 5,000 रॉकेट डागले. एवढेच नाही तर इस्रायलमध्ये घुसखोरी करून काही लष्करी वाहने ताब्यात घेण्यात आली. या युद्धात दोन्ही बाजूंचे शेकडो लोक मरण पावले. इस्रायलकडून गाझा पट्टीवर सातत्याने बॉम्बफेक करण्यात येत आहे. त्याचवेळी पॅलेस्टाईनमधील हमासचे आतंकवादीही अद्याप शांत झालेले नाहीत. ते अजूनही तीन आघाड्यांवरून इस्रायलवर हल्ले करत आहेत. लेबनॉन, समुद्राला लागून असलेला भाग आणि इजिप्तला लागून असलेल्या दक्षिण गाझा येथून रॉकेट आणि क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. (Israel Hamas War)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.