Operation Ajay : इस्त्रायलवरून भारतीयांना घेऊन येणारी चौथी फेरी मायदेशात दाखल; आतापर्यंत ‘इतके’ नागरिक परतले

68
Operation Ajay : इस्त्रायलवरून भारतीयांना घेऊन येणारी चौथी फेरी मायदेशात दाखल; आतापर्यंत 'इतके' नागरिक परतले

भारत सरकारने इस्रायल युद्धभूमीत अडकलेल्या १८ हजार भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’ (Operation Ajay) सुरू केले आहे. या अंतर्गत पहिले विशेष विमान गुरुवारी १२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी बेन गुरियन विमानतळावरून रात्री ९ वाजता २१२ प्रवाशांना घेऊन भारताकडे रवाना झाले होते. हे विमान शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता भारतात पोहोचले. त्यानंतर शनिवार १४ ऑक्टोबर रोजी १९७ भारतीयांना घेऊन ऑपरेशन अजयचे विमान दिल्लीत दाखल झाले तर आज रविवार १५ ऑक्टोबर रोजी ‘ऑपरेशन अजय’ची २७४ नागरिकांसह चौथी तुकडी भारतात परतली. अशातच आतापर्यंत ऑपरेशन अजयच्या माध्यमातून तब्बल ९१५ भारतीयांना मायदेशी सुखरूप आणले गेले आहे. (Operation Ajay)

(हेही वाचा – Jammu Kashmir : हिंदूंनो, परिसर सोडा; नाहीतर किंमत चुकवावी लागेल; जम्मू-काश्मीरमधील हिंदू पुन्हा का झाले भयभीत)

घमासान युद्ध सुरू असलेल्या इस्रायलमधून अडकलेल्या भारतीयांना घेऊन आतापर्यंत चार विमानं भारतात उतरली आहेत. ‘ऑपरेशन अजय’ (Operation Ajay) अंतर्गत भारत सरकार ही मोहीम राबवत आहे. इस्रायलमधील तेल अवीव येथे भारतीय नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मायभूमीत परतण्यासाठी हजारो भारतीयांची धावाधाव सुरू आहे. प्रवाशांनी विमानतळावर उतरताच इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी सांगितल्या. तसेच मायभूमीत उतरल्याचा आनंदही व्यक्त केला. आपल्या लहान मुलांसोबत अनेकजण भारतात (Operation Ajay) परतले. त्यावेळी, भारत सरकारचे सर्वांनी आभारही मानले.

शनिवार ७ ऑक्टोबरपासून (Israel Palestine Conflict) इस्त्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यात युद्ध सुरूच आहे. या युद्धात आतापर्यंत अनेक व्यक्ती मृत्यूमुखी पडले आहेत. अशातच इस्त्रायलकडून गाझापट्टीत नागरी वस्त्या टार्गेट करण्यात आल्या. गाझापट्टीमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जबिलीया निर्वासित छावणीवर सुद्धा इस्त्रायलकडून हल्ला करण्यात आला. या युद्धजन्य परिस्थितीत नोकरी, शिक्षण आणि इतर कारणांनी इस्रायलमध्ये अडकलेल्या नागरिकांना मायदेशी सुखरूप परत आणण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. (Operation Ajay)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.