Sharad Pawar : शरद पवारांच्या निर्णयावर सुधीर मुनगंटीवारांनी मारला टोला; म्हणाले… 

शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा त्याग करत राजीनामा जाहीर केला आहे.

151
शरद पवारांच्या निर्णयावर सुधीर मुनगंटीवारांनी मारा टोला
शरद पवारांच्या निर्णयावर सुधीर मुनगंटीवारांनी मारा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली, त्यावर विविध राजकीय पक्षांचे नेते प्रतिक्रिया देत असताना भाजपचे नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र मार्मिक टोला हाणला आहे.

शरद पवारांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर पत्रकारांनी सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यताच काढली आहे. मग राष्ट्रीय अध्यक्ष कसा? निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. त्यामुळे यावर भाष्य करण्याची आवश्यकताच नाही. प्रादेशिक अध्यक्ष असेल तर ठीक आहे. पण यावर मी भाष्य करण्याची आवश्यकताच नाही, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

बावनकुळेंनीही काढला चिमटा

दरम्यान, शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा त्याग करत राजीनामा जाहीर केला आहे. तर, जितेंद्र आव्हाड यांनीही प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच, राष्ट्रवादीत अस्थिरता निर्माण झाल्याचेही चित्र असल्याचे बोलले जात आहे. अध्यक्षपदावरून पक्षात फूट पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. यावरून भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मिश्किल टोलाही लगावला आहे. आमच्या कार्यालयात पक्षप्रवेशासाठी कुणीही आले तर आम्ही त्यांचा पक्षप्रवेश करू…अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्याही नेत्याने आमच्याशी तसा संपर्क साधला नाही, असे विधान बावनकुळे यांनी केले.

(हेही वाचा Sharad Pawar : शरद पवारांनी गिरवला बाळासाहेब ठाकरेंचा धडा; काय घडले होते १९९२ ला?)

संजय शिरसाट काय म्हणाले?

शरद पवारांचे कार्यकर्त्यांवरचे प्रेम सर्वांनाच माहिती आहे. आजही त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांची नावे माहिती आहेत. त्याचप्रमाणे आज कामाच्याबाबतीत विचार केला, तर अजित पवारांचे नाव पुढे येते. सकाळी ८ वाजता येऊन मंत्रालायत बसणे असो किंवा कार्यक्रमांना वेळेवर हजेरी लावणे असो, कामाच्याबाबतीत त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही. त्यामुळे उद्या जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा विषय आलाच तर निश्चित अजित पवार हे अध्यक्ष झाले पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भावना असेल, असे संजय शिरसाट म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.