Sharad Pawar : शरद पवारांनी गिरवला बाळासाहेब ठाकरेंचा धडा; काय घडले होते १९९२ ला?

बाळासाहेबांची शिवसेना फुटली आणि त्यानंतर पवारांची राष्ट्रवादीही त्याच उंबरठ्यावर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली. अखेरीस आज पवारांनी आपल्याच मित्राच राजीनामास्त्र उपसले. 

220
शरद पवारांनी गिरवला बाळासाहेब ठाकरेंचा धडा
शरद पवारांनी गिरवला बाळासाहेब ठाकरेंचा धडा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांनी अचानक अध्यक्षपदाचा राजीनामा देणार अशी घोषणा केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली. अशीच घोषणा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा केली होती. त्यावेळी लाखो शिवसैनिकांनी मातोश्रीकडे धाव घेतली होती. त्यानंतर बाळासाहेबांनी सर्वांच्या भावनांचा आदर करत निर्णय मागे घेतला होता. आता हात प्रसंग शरद पवार यांच्या बाबतीत घडला आहे.
१९७८ च्या मुंबई महापालिकेत शिवसेनेने पूर्ण ताकदीने ११७ उमेदवार मैदानात उतरवले पण या निवडणुकीत फक्त २१ उमेदवारच निवडून आले होते. या निवडणुकीत पराभव झाल्यामुळे बाळासाहेब चांगलेच संतापले होते. त्यांनी शिवाजी पार्कवर मेळावा बोलावला आणि राजीनामा देत असल्याची घोषणाच करून टाकली. बाळासाहेबांनी अचानक घोषणा केल्यामुळे शिवसैनिक पुरते हादरले. मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी एकच गर्दी केली. रडारड आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. अखेरीस बाळासाहेबांनी आपला निर्णय मागे घेतला. त्यानंतर बाळासाहेबांसमोर पुन्हा एकदा असाच पेच प्रसंग निर्माण झाला. बाळासाहेबांवरच घराणेशाहीचा आरोप झाला. तो काळ होता १९९२ चा. त्यावेळी माधव देशपांडे या शिवसैनिकाने बाळासाहेब ठाकरे हे मुलांनाच मोठे करत असल्याचा आरोप केला होता. या आरोपांमुळे शिवसेनाप्रमुख व्यथित झाले आणि त्यांनी सामना दैनिकात शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांचा कुटुंबासह अखेरचा जय महाराष्ट्र असे निवेदनच देऊन टाकले. मग काय शिवसैनिकांनी मातोश्रीकडे धाव घेतली. मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी एकच गर्दी केली होती. भर पावसामध्ये शिवसैनिक मातोश्रीबाहेर उभे होते. शिवसैनिकांचे हे प्रेम पाहून बाळासाहेबांनी राजीनामास्त्र तलवार म्यान केली.
(हेही वाचा Supriya Sule : सुप्रिया सुळेंच्या २ राजकीय गौप्यस्फोटाच्या घोषणेची चर्चा; एक पवारांचा राजीनामा, दुसरा?)

शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. दोन्ही नेते वेगवेगळ्या पक्षांचे जरी असले तरी राजकीय विषय आला तर एकमेकांवर टीका करणार आणि जर मैत्रीचा विषय आला तर एकत्र जेवणार. अशी ही शरद पवार Sharad Pawar आणि बाळासाहेबांची मैत्री होती. त्यामुळे पवारांनी कित्येक सभा आणि कार्यक्रमामध्ये बाळासाहेबांसारखा दोस्त नाही, असे बोलून दाखवले आहे. आधीच बाळासाहेबांची शिवसेना फुटली आणि त्यानंतर पवारांची राष्ट्रवादीही त्याच उंबरठ्यावर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली. अखेरीस आज पवारांनी आपल्याच मित्राच राजीनामास्त्र उपसले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.