खंजीर, खंजीर करता…देव करो तुम्हाला बोधचिन्ह खंजीरच मिळो! मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंना टोला

96
सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतली, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी ज्यांच्यावर विश्वास दाखवला त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला, असे वक्तव्य केले. त्यावर भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ‘सारखे खंजीर, खंजीर करता…देव करो तुम्हाला बोधचिन्ह खंजीर मिळो’, अशा शब्दांत पलटवार केला.

महाराष्ट्र तोडणार ही रेकॉर्ड खूप जुनी झाली

बाळासाहेबांचे फोटो हे विचारांसाठी सर्वजण लावतात. फक्त त्यांच्या मुलानेच फोटो लावावा, हा जर हट्ट असेल तर मग उद्या शिवसैनिकांना पण त्यांचा फोटो लावता येणार नाही. कारण बाळासाहेब काही त्यांचे वडील नाही. तुमची जर ही भूमिका असेल तर मग तुम्ही मोदींचे फोटो का लावले, तुमचे काही नाते होते का? असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. जो कोणी हातात भगवा घेतो तो बाळासाहेबांचा फोटो लावतो, यात दुःख व्यक्त करण्यापेक्षा आनंद व्यक्त केला पाहिजे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र तोडणार ही रेकॉर्ड खूप जुनी झाली आहे. हे सर्व सहानुभूती घेण्यासाठी आहे. मुंबई तोडण्याचे महापाप तर काँग्रेसचे आहे, तुम्ही अजुनही काँग्रेसच्या मांडीवर आहात. महाविकास आघाडीतून बाहेर निघालेले नाहीत. मुंबईमध्ये एकदा यांचा पराभव केल्याशिवाय यांची शब्द रचना बदलणार नाही, अशी खरमरीत टीका मुनगंटीवार यांनी केली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.