Sudhir Mungantiwar : पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यानंतर सुधीर मुनगंटीवार आता व्हॉटसॲप चॅनलवर

154
Sudhir Mungantiwar : पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यानंतर सुधीर मुनगंटीवार आता व्हॉटसॲप चॅनलवर

महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आता राज्यातील जनतेशी थेट व्हॉटसॲपवरून जोडले गेले आहेत. १९ सप्टेंबर म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी सुधीर मुनगंटीवार यांच्या ‘Sudhir Mungantiwar | सुधीर मुनगंटीवार’ या व्हॉटसॲप चॅनलचा शुभारंभ करण्यात आला. सुधीर मुनगंटीवार यांच्या अखत्यारीत असलेल्या तीनही विभागांचे महत्वाचे निर्णय, मुनगंटीवार यांनी केलेली विविध कामे, संबंधित योजना, विविध विकास प्रकल्प आदींची अचूक आणि अधिकृत माहिती, त्यांचे विविध कार्यक्रम, दौरे, बैठका यांची माहिती या व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून आता थेट जनतेपर्यंत पोहोचणार आहे.

समाजातील संवाद माध्यमांमध्ये नवीन तंत्रज्ञानानुसार वेगाने बदल होत असून सर्वसामान्यांचे संवादाचे प्रभावीे माध्यम ठरलेल्या ‘व्हॉटसॲप’ने चॅनलच्या माध्यमातून संवादाचा नवीन मार्ग उपलब्ध करून दिला आहे. व्हॉट्सॲप चॅनेलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री सचिवालयाच्या चॅनल सोबत स्वतःचे व्हॉट्सॲप चॅनेल सुरु करणारे सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे पहिलेच मंत्री ठरले आहेत.

(हेही वाचा – WhatsApp Channel : मुख्यमंत्री शिंदेंचे  कार्यालय आता व्हॉटसॲप चॅनलवर!)

सोबत दिलेल्या दुव्यावरून आपल्या या चॅनेलला फॉलो करण्याचे आवाहन (Sudhir Mungantiwar) सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. या चॅनेलवरून सोप्या पद्धतीने सर्व अधीकृत माहिती जनतेला थेट हातातील स्मार्टफोनवर मिळणार आहे.

या व्हॉट्सॲप चॅनेलला केवळ स्वतःच्या व्हॉट्सॲपवरून फॉलो करायचे आहे. त्यासाठी कुठलीही नोंदणी करण्याची आवश्यकता नसून आपला व्हॉट्सॲप क्रमांकही व्हॉटेसॲपकडून गुप्त राखला जातो. शिवाय एका व्हॉट्सॲप चॅनेलला किती लोकांनी फॉलो करावे यावरही व्हॉट्सॲप ग्रुपसारखे काही बंधन नाही. त्यामुळे व्हॉट्सॲप चॅनेले हे अधिक मुक्त, स्वतंत्र आणि प्रभावी असे लोकप्रिय संवाद माध्यम ठरेल, असे मत (Sudhir Mungantiwar) सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.