चित्रा वाघ यांचा उर्फीला विरोध; टार्गेट मात्र रुपाली चाकणकर

133

सध्या भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मॉडेल उर्फी जावेदच्या सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन करण्याच्या प्रकाराला जोरदार विरोध केला आहे. त्यावर उर्फीदेखील चित्रा वाघ यांना उलट उत्तर देत असल्याने वाद आणखी चिघळत आहे. आता हा वाद चित्रा वाघ आणि उर्फी यांच्या पुरता मर्यादित राहिलेला नाही, कारण या वादात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर केंद्रस्थानी आल्या आहेत. चाकणकर यांनी थेट उर्फीला पाठींबा दिला आहे. तेव्हापासून चित्रा वाघ यांच्या टार्गेटवर रुपाली चाकणकर आल्या आहेत.

चित्रा वाघ पहिल्या नाहीत 

चित्रा वाघ यांच्यासारख्या राजकारणातील आघाडीच्या नेत्या उर्फीला का विरोध करत आहेत, असा प्रश्न  सर्व सामान्यांना पडला आहे. माध्यमेही यावर प्रश्न विचारतात तेव्हा आपला विरोध व्यक्तीला नसून प्रवृत्तीला आहे, असे चित्रा वाघ म्हणत आहेत. या प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली आहे. उर्फीने कोणते कपडे घालायचे हा तिला घटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा भाग आहे, अशी भूमिका आयोगाने घेतली आहे. तर चित्रा वाघ यांनी ‘उर्फी सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन करत आहे, हे चुकीचे आहे, हा नंगानाच आहे’, अशी भूमिका घेतली आहे. उर्फीने आता महिला आयोगाकडे जाऊन चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार केली आहे. रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदी निवड झाली. तसेच शिंदे सरकारच्या काळातही त्या अजून कायम आहेत. मविआ सरकारच्या काळात चाकणकर यांनी हिंदुत्ववादी नेते संभाजी भिडे आणि भाजप नेते आशिष शेलार यांना नोटीस बजावली होती, आता शिंदे-फडणवीस सरकारच्या काळातही त्यांनी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना नोटीस दिली आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर आता चित्रा वाघ यांच्या टार्गेट बनल्या आहेत का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

(हेही वाचा सोशल मीडियाच्या ‘boycott’ ने बॉलिवूड हादरले)

रुपाली चाकणकरांनी कुणाला दिली नोटीस! 

संभाजी भिडे यांना नोटीस 

शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी एका महिला पत्रकाराला बोलताना ‘आमची अशी भावना आहे, प्रत्येक स्त्री भारतमातेचे रूप आहे. भारतमाता विधवा नाही. कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन, असे म्हटले होते. त्यानंतर राज्य महिला आयोगाने संभाजी भिडे यांना नोटीस दिली होती. संभाजी भिडे यांनी माफी मागितली.

आशिष शेलारांच्या विरोधात पोलिसांना निर्देश  

बीडीडी चाळीत सिलिंडर ब्लास्ट झाला होता. त्यामध्ये एका बाळाचा मृत्यू झाला. नायर रुग्णालयात उपचारासाठी ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागल्याने बाळाचा मृत्यू झाला. सिलिंडर स्फोटानंतर ७२ तासांनी मुंबई महापौर पोहचल्या, एवढे तास कुठे निजला होतात? असे भाजपचे नेते आशिष शेलार म्हणाले होते. त्यानंतर हे अपशब्द असल्याचे म्हणत रुपाली चाकणकर यांनी मुंबई पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

चित्रा वाघ यांना बनल्या लक्ष्य  

भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मॉडेल उर्फी जावेद ही सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन करत असल्याचा आरोप करत चित्रा वाघ यांनी तिला विरोध सुरु केला. त्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली. त्या नोटिसीला चित्रा वाघ यांनी उत्तर दिले आहे.

(हेही वाचा हिंदू संस्कृतीकडे पाठ फिरवली, ‘बहिष्कार’अस्त्राची धार वाढली!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.