ड्रग्स प्रकरणात मलिकांनी आता केली ‘ही’ मागणी

82

मागच्या काही दिवसांपासून ड्रग्सवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग्सच्या प्रकरणात उडी घेतली आणि या प्रकरणाला नवे वळण आले. आता पुन्हा एकदा मलिकांनी या ड्रग्सप्रकरणात एनआयएकडे एक मागणी केली आहे. समुद्रामार्गे गुजरातमधून देशभरात ड्रग्सचा व्यापार चालू आहे, हे आता सिद्ध होत आहे. त्यामुळे याच्यामागे कोण आहे याचा खुलासा एनसीबी आणि एनआयए यांनी करावा अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

‘या’ कायद्याची करा अंमलबजावणी

काल गुजरातच्या द्वारका येथे ३५० कोटींचे ड्रग्ज सापडले आहेत. त्याआधी मुंद्रा एअरपोर्टवर तीन टन ड्रग्ज सापडले होते. त्याची किंमत २७ हजार कोटी रुपये होती. या ड्रग्जच्या खेळात मनिष भानुशाली, धवल भानुशाली, केपी गोसावी, सुनिल पाटील हे किरीटसिंग राणा यांच्याकडे वारंवार का जात आहेत. हे सगळे गुजरातच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कशासाठी रहात आहेत अशी विचारणाही नवाब मलिक यांनी केली आहे.मुंद्रा एअरपोर्टवरील ड्रग्स प्रकरण एनआयएकडे सोपविण्यात आले आहे. आता द्वारका येथे ३५० कोटींचे ड्रग्स सापडल्यानंतर एनसीबीने यातून सत्य बाहेर काढावे. या देशातून अमली पदार्थांचा व्यापार नेस्तनाबूत करण्यासाठी १९८५ मध्ये कायदा करण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

कोणीही असो शिक्षा झाली पाहिजे

मुंबईत दोन – चार ग्रॅम ड्रग्स पकडून बॉलिवूडला बदनाम करुन प्रसिद्धी करण्यात येत आहे. समुद्रामार्गे ड्रग्स येत आहे त्याच  गुजरातमध्ये रॅकेट सुरू आहे. हे सगळं मनिष भानुशाली, धवल भानुशाली व त्यांचे इतर सहकारी गुजरातमधून सांभाळत आहेत. त्यामुळे या तपासाचा छडा एनसीबी व एनआयए यांनी लावावा मग यामध्ये कोण कितीही मोठा असो, मंत्री असो किंवा कार्यकर्ता असो, हे न पहाता ड्रग्जच्या खेळात जो कुणी जबाबदार असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाईअंती शिक्षा झाली पाहिजे अशी अपेक्षा एनसीबी आणि एनआयए यांच्याकडून नवाब मलिक यांनी केली आहे.

(हेही वाचा :‘वीर सावरकरां’चा विसर; नाशिककर आक्रमक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.