New Parliament House : गणेश चतुर्थीपासून कामकाज चालू होणाऱ्या संसदेच्या इमारतीत काय आहे खास ?

24
New Parliament House : गणेश चतुर्थीपासून कामकाज चालू होणाऱ्या संसदेच्या इमारतीत काय आहे खास ?
New Parliament House : गणेश चतुर्थीपासून कामकाज चालू होणाऱ्या संसदेच्या इमारतीत काय आहे खास ?

संसदेचे विशेष अधिवेशन संसदेच्या नवीन इमारतीत होणार असल्याची चर्चा आहे. (New Parliament House) नवीन संसदेतील कामकाज गणेश चतुर्थीच्या दिवशी सुरू होणार आहे. संसदेचे पाच दिवसीय विशेष अधिवेशन येत्या 18 सप्टेबरपासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज संसदेच्या जुन्याच इमारतीत होईल; परंतु, दुस-या दिवशी अर्थात 19 सप्टेबर रोजी गणेश चतुर्थी आहे. या शुभमुहुर्तावर संसदेचे कामकाज नवीन इमारतीत स्थानांतरित केले जाईल, अशी चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 मे रोजी नवीन इमारतीचे उद्घाटन केले होते.

(हेही वाचा – Gokhale Bridge : गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाआड येणारी २८ बांधकामे हटवली)

नवीन संसद भवनाचे बांधकाम कधी सुरू झाले ?

5 ऑगस्ट 2019 रोजी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांनी सरकारला नवीन संसद भवन बांधण्याची विनंती केली होती. यानंतर 10 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान मोदींनी संसदेच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली. नवनिर्मित संसद भवन विक्रमी वेळेत दर्जेदार पूर्ण झाले आहे. (New Parliament House)

नवीन आणि जुन्या इमारतीत काय फरक आहे ?

संसदेची सध्याची इमारत 1927 मध्ये पूर्ण झाली, जी आता जवळपास 100 वर्षे जुनी होणार आहे. या इमारतीत सध्याच्या गरजेनुसार जागेची कमतरता आहे. दोन्ही सभागृहात खासदारांसाठी सोयीस्कर आसन व्यवस्थेचाही अभाव होता. हे लक्षात घेऊन लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांनी संसदेसाठी नवीन इमारत बांधण्यासाठी सरकारला आग्रह धरणारे ठराव पारित केले होते. नवनिर्मित संसद भवन भारताच्या गौरवशाली लोकशाही परंपरा आणि घटनात्मक मूल्यांना अधिक समृद्ध करेल.

नवीन संसदभवनात 888 सदस्य लोकसभेत बसू शकतील. संसदेच्या सध्याच्या इमारतीत लोकसभेतील 543 आणि राज्यसभेतील 250 सदस्यांसाठी आसनव्यवस्था आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन संसदेच्या नव्याने बांधलेल्या इमारतीत लोकसभेतील 888 आणि राज्यसभेतील 384 सदस्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन लोकसभेच्या सभागृहात होणार आहे. (New Parliament House)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.