Assembly Elections : काँग्रेस-भाजपला लहान पक्षांचे आव्हान

विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या पाचही राज्यांत लहान पक्षांनी मोठ्या पक्षांचा बीपी वाढविला आहे. यामुळे समीकरण बिघडण्याची भीती सुध्दा राष्ट्रीय पक्षांच्या मनात निर्माण झाली आहे.

104
Assembly Elections : काँग्रेस-भाजपला लहान पक्षांचे आव्हान
Assembly Elections : काँग्रेस-भाजपला लहान पक्षांचे आव्हान

विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या पाचही राज्यांत लहान पक्षांनी मोठ्या पक्षांचा बीपी वाढविला आहे. यामुळे समीकरण बिघडण्याची भीती सुध्दा राष्ट्रीय पक्षांच्या मनात निर्माण झाली आहे. (Assembly Elections)

मध्यप्रदेश आणि राजस्थानसह पाचही राज्यांमध्ये निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांत मुख्य लढत आहे ती भाजप आणि काँग्रेसमध्ये. मात्र, याच राज्यांमध्ये सपा, बसपा, हमराज पार्टी, आप, राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष, भारतीय आदिवासी पक्षांनी मैदानात उडी मारल्यामुळे मुकाबल त्रिकोणी झाला आहे. तेलंगनामध्ये मुख्य मुकाबला आहे तो काँग्रेस आणि भारत राष्ट्र समितीमध्ये. येथे भाजपमुळे तिरंगी होणे आहे. तर मिझोरममध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांमुळे लढत त्रिकोणी झाली आहे. (Assembly Elections)

२०१८ च्या निवडणुकीत मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये छोट्या पक्षांच्या प्रभावामुळे भाजप आणि काँग्रेसला मते कमी पडली होती. राजस्थानमध्ये काँग्रेसला ३९.८ टक्के मते आणि ९९ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला ३९.३ टक्के मते आणि ७३ जागा मिळाल्या. म्हणजे दोन्ही पक्षांच्या मतांमधील फरक केवळ ०.६ टक्के होता. बसपाने चार टक्के मते मिळवित सहा जागा जिंकल्या होत्या. तर हनुमान बेनिवाल यांच्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाने २.४ टक्के मते मिळवित तीन जागा जिंकल्या होत्या. यावेळी बसपा पुन्हा मैदानात उतरला आहे. (Assembly Elections)

याशिवाय, राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाने भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद रावण यांच्या आझाद समाज पक्षाशी आघाडी केला आहे. जाट आणि दलित मते एकत्र करण्याचा हनुमान बेनिवाल यांचा प्रयत्न असून त्यामुळे अनेक जागांवर भाजप आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत होऊ शकते. अशा प्रकारे आदिवासी बहुल भागात भारतीय आदिवासी पक्ष आपली ताकद दाखवू शकतो. (Assembly Elections)

मध्यप्रदेशात घटक पक्ष काँग्रेसचे गणित बिघडविणार

मध्य प्रदेशात सपासोबतच वाद काँग्रेससाठी मोठे आव्हान ठरू शकते. सपा, बसपा, जेडीयू आणि आप रिंगणात आहेत. या पक्षांनी एक तृतीयांशपेक्षा जास्त जागांवरील लढाई रंगतदार बनविली आहे. २०१८ च्या निवडणुकीत काँग्रेसने ११४ जागा मिळवित सरकार बनविले होते. यावेळी भाजपला १०९ जागा मिळाल्या होत्या. तरीही भाजपच्या मतांची टक्केवारी काँग्रेसपेक्षा जास्त होती. (Assembly Elections)

बसपाला ५.१ टक्के मते आणि दोन जागा मिळाल्या होत्या. सपाने १.३ टक्के मतांसह एक जागा जिंकली होती. यावेळी बसपने गोंडवाना रिपब्लिक पार्टीसोबत युती केली आहे. हे दोन्ही पक्ष दलित-आदिवासी मतांना कितपत एकत्र करून एकत्र करू शकतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे. (Assembly Elections)

(हेही वाचा – Maratha Reservation: संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल स्वीकारला, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय)

छत्तीसगडमध्ये अनेक छोट्या पक्षांची उपस्थिती

९० जागांच्या छत्तीसगड विधानसभेच्या निवडणुकीत अनेक छोट्या पक्षांनी दंड थोपटल्यामुळे भाजप आणि काँग्रेस यांच्यातील थेट लढत रोमांचक झाली आहे. दलित-आदिवासी मतांवर विसंबून बसपा आणि गोंडवाना रिपब्लिक पार्टीची युती रिंगणात आहे. अजित जोगी यांच्या जनता काँग्रेसला छत्तीसगडमध्ये फारसा जनाधार शिल्लक नसला, तरी अनेक जागांवर मते कमी करण्याचे काम ते नक्कीच करेल. (Assembly Elections)

तेलंगणात भाजपचा खेळ बिघडू शकतो

तेलंगनाची लढाई सत्ताधारी भारत राष्ट्र समिती आणि काँग्रेसमध्ये आहे. २०१८ मध्ये टीडीपीने काँग्रेससोबत युती केली होती. २०१९ मधील लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले होते. परंतु, विधानसभेच्या निवडणुकीत पुनरावृत्ती करता येईल काय? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सत्ताविरोधी मतांचे विभाजण झाले तर काँग्रेसच्या स्वप्नांवर विरजण पडू शकते यात दुमत नाही. भाजप तिरंगी लढत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. (Assembly Elections)

मिझोराममध्ये काँग्रेस आणि मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात मुख्य लढत आहे. मात्र झोराम पीपल्स मुव्हमेंटच्या उपस्थितीने यावेळी स्पर्धा तिरंगी झाली आहे. येथे भाजपही चांगला परफॉर्मेंस करण्याची तयारी करीत आहे. (Assembly Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.