Maratha Reservation : राज्याच्या अनेक भागात एसटीच्या फेऱ्या रद्द

मराठा आंदोलनामुळे सार्वजनिक वाहतूक प्रभावीत

103
Maratha Reservation : राज्याच्या अनेक भागात एसटीच्या फेऱ्या रद्द

राज्याच्या विविध भागात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला (Maratha Reservation) हिंसक वळण आले आहे. आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी अनेक ठिकाणी एसटी बसेसची जाळपोळ केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यत आल्या असून सार्वजनिक वाहतूक प्रभावित झाली आहे. तसेच राज्य परिवहन महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

यासंदर्भात राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार खबरदारीचा (Maratha Reservation) उपाय म्हणून अनेक जिल्ह्यातील एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सोलापूर विभागातील सर्व एसटी आगाराची वाहतूक पूर्ण बंद आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या 70 हून अधिक बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे, छत्रपती संभाजीनगर, पंढरपूर, बीड, अंबड, लातूर, नांदेड याठिकाणी जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या रद्द केल्या आहेत. याशिवाय छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी दुपारपासून बस सेवा ठप्प आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 1400 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर 160 बसेस मध्यवर्ती बस स्थानकात उभ्या आहेत.त्यासोबतच पुणे, नागपूरसह राज्यातील अनेक भागांतून मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. एसटी बसेसची जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. बीडमध्ये शंभरपेक्षा जास्त बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे बस सेवा ठप्प झाली आहे. (Maratha Reservation)

(हेही वाचा – Maratha Reservation : कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा ठोस निर्णय घेऊ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जरांगे पाटीलांना आश्वासन)

यासोबतच एसटी महामंडळाच्या (Maratha Reservation) ताफ्यात आलेल्या नवीन स्लीपर बसेस परत बोलवण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजी नगरहून निघणाऱ्या आणि छत्रपती संभाजी नगरमध्ये येणाऱ्या सर्व बसेस बंद करण्यात आल्या आहेत. गेल्या 3-4 दिवसांपासून मराठवाड्यातील परभणी, धाराशीव, लातूर, जालना, नांदेड या जिल्ह्यातील सर्व एसटी वाहतूक बंद आहे. एसटी बसेसची मोडतोड, जाळपोळ झाल्याने अंदाजे 1 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. विभागातील वाहतूक पूर्णतः, अथवा अंशतः बंद असल्याने दररोज एसटीचा (Maratha Reservation) दोन ते अडीच कोटी रुपयांचा महसूल बुडत आहे. सोबतच प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.