Shivsena : पगारवाढ दिली नाही म्हणून ‘शिवसेना भवना’तील कर्मचाऱ्यांचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’; शिंदेंना समर्थन

शिवसेना (Shivsena) भवनाचे प्रशासकीय कामकाज पाहणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांसोबतही त्यांच्या पगार वाढीच्या मागणीवर बैठका झाल्या होत्या.

108
Shivsena : पगारवाढ दिली नाही म्हणून 'शिवसेना भवना'तील कर्मचाऱ्यांचा ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'; शिंदेंना समर्थन

एकेक करून जुने सहकारी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करीत शिंदेंच्या (Shivsena) गोटात दाखल होत असताना, आता हे बंडाचे लोण थेट शिवसेना भवनापर्यंत येऊन पोहोचले आहे. ठाकरेंनी पगार वाढवला नाही म्हणून शिवसेना भवनात काम करणाऱ्या सातपैकी चार कर्मचाऱ्यांनी शिंदे गटाचा रस्ता धरला आहे.

(हेही वाचा – ‘छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाचं उदात्तीकरण खपवून घेणार नाही, कोण यांना फुस लावतंय? याची चौकशी करणार…’)

या चार कर्मचाऱ्यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Shivsena) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. पूर्वी शिवसेना आणि आता ठाकरे गटासाठी लोगो डिझाईनिंग आदी कलात्मक कामांसोबत सेनाभवनातील कॉल सेंटरमध्ये सातजणांचे पथक कार्यरत होते. यातील अमोल मटकर, अमित शिगवण यांच्यासह चौघांनी शिवसेना भवनाला रामराम ठोकला आहे. कमी पगारात ही टीम कार्यरत होती. पगार वाढावा या मागणीसाठी अनेकदा त्यांनी संबंधित नेत्यांशी चर्चा केली होती.

‘त्या’ नेत्याचा हात…

शिवसेना (Shivsena) भवनाचे प्रशासकीय कामकाज पाहणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांसोबतही त्यांच्या पगार वाढीच्या मागणीवर बैठका झाल्या होत्या. मात्र, या बैठकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नाही. परिणामी, या चौघांनीही शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेना भवनाच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या आणि आता शिंदे गटात असलेल्या एका नेत्यानेच या कर्मचाऱ्यांचा पक्षप्रवेश घडवून आणल्याचे कळते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.