Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळ २०२४ मध्ये प्रवाशांसाठी खुले होणार

हे विमानतळ ११.४ किलोमीटर परिसरात उभे राहत असून दोन धावपट्या असतील, असेही फडणवीस यांनी सांगितले.

83
Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळ २०२४ मध्ये प्रवाशांसाठी खुले होणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Navi Mumbai Airport) २०२४ पासून वाहतुकीसाठी खुले करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या विमानतळाच्या कामातील अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नवी मुंबई विमानतळाची (Navi Mumbai Airport) हेलिकॅप्टरद्वारे पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिंदे म्हणाले, नवी मुंबई विमानतळ हे पुणे, मुंबई, गोवा यांच्यासाठी महत्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे भूमीपूजन झाले होते आणि उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होईल. विमानतळ उभारणीत चांगले आणि वेगाने काम सुरु आहे, यांचा आनंद आहे. हा प्रकल्प लवकरच लोकांसाठी खुला होईल यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत.

(हेही वाचा – ‘छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाचं उदात्तीकरण खपवून घेणार नाही, कोण यांना फुस लावतंय? याची चौकशी करणार…’)

देशातील अद्वितीय विमानतळ

नवी मुंबई विमानतळाचे (Navi Mumbai Airport) काम अतिशय वेगाने सुरु असून हे विमानतळ देशातील अद्वितीय असे विमानतळ असेल अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०२४ पर्यंत हे विमानतळ सुरु करण्याचा प्रयत्न असेल. यादृष्टीने विमानतळाच्या कामात येणाऱ्या अडचणी सोडवून कामाला गती द्यावी हा आजच्या पाहणीचा उद्देश असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. विविध दळणवळणाची साधने या विमानतळाला जोडण्यात येणार असल्याने हे विमानतळ देशातील अद्वितीय असे विमानतळ म्हणून गणले जाईल. मुंबईला विमानतळाच्या माध्यमातून एक चांगली भेट देणार असल्याचे ही फडणवीस म्हणाले.

विमानतळाची वैशिष्ट्ये

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Navi Mumbai Airport) २२ किलोमीटरचा सिलिंक महत्वाचा दुवा ठरेल. दरवर्षी ९ कोटी प्रवासी वाहतूक होईल. म्हणूनच मोठ्या शहारासाठी हा प्रकल्प लोकांना दिलासा देणारा आहे. याची क्षमता वाढविण्यासाठी परवानगीची कामे युद्धपातळीवर सुरु आहेत. पहिल्या टप्प्यात चार टर्मिनल असून ४२ विमाने उभी राहतील. ५ हजार ५०० क्षमतेचे कार पार्किंग असेल. हे विमानतळ ११.४ किलोमीटर परिसरात उभे राहत असून दोन धावपट्या असतील, असेही फडणवीस यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.