शिवसेना (Shivsena) पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होऊ शकली नाही. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहन यांच्या त्रिस्तरीय खंडपीठासमोर हे प्रकरण उपस्थित झाले होते. मात्र, युक्तिवादाच्या पूर्वतयारीसाठी काही अतिरिक्त वेळ हवा असल्याची विनंती ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला केली. खंडपीठाने ही विनंती मान्य करत या प्रकरणाची पुढील सुनावणी आता बुधवारी घेण्याचे निश्चित केले आहे. (Shivsena)
(हेही वाचा – Iran US Talk मधून पाकिस्तान बाहेर; डोनाल्ड ट्रम्प यांचा सौदी-यूएई-कतारवर विश्वास )
निवडणूक आयोग आणि आमदारांच्या अपात्रतेचे आव्हान
भारत निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अधिकृत शिवसेना म्हणून दिलेली मान्यता आहे. तर धनुष्यबाण चिन्ह वाटप याविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याशिवाय महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी शिवसेनेतील आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिला होता. या निर्णयाला आव्हान देणारी शिवसेना उबाठाचे नेते सुनील प्रभु यांची याचिकाही याच खटल्यासोबत जोडण्यात आली आहे. दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार असल्याने या कायदेशीर लढाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Shivsena)
(हेही वाचा – बिहारचा आनंद साजरा करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे पाहा; संजय राऊतांवर BJP चा जोरदार हल्लाबोल )
न्यायालयात झालेला युक्तिवाद आणि राजकीय भवितव्य
सुनावणीदरम्यान सरन्यायाधिशांनी हे प्रकरण दुसऱ्या दिवशी घेण्याबाबत विचारणा केली. त्यावर सिब्बल यांनी पूर्ण तयारीनिशी दुपारी युक्तिवाद करण्याची इच्छा व्यक्त केली. मागील सुनावणीत सिब्बल यांनी आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा उपस्थित करत २०२२ मधील राजकीय बंडखोरीचा घटनाक्रम न्यायालयासमोर मांडला होता. पक्षाची खरी ओळख आणि चिन्हाचा निर्णय महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाची दिशा ठरवणारा असल्याने बुधवारी होणाऱ्या सुनावणीला राजकीय वर्तुळात मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
हेही पहा –


