बिहारचा आनंद साजरा करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे पाहा; संजय राऊतांवर BJP चा जोरदार हल्लाबोल

74
गणेशोत्सवावरून Sanjay Raut यांना भाजपाचा थेट इशारा; म्हणाले...
गणेशोत्सवावरून Sanjay Raut यांना भाजपाचा थेट इशारा; म्हणाले...
  • विशेष प्रतिनिधी

बिहारमधील पोटनिवडणुकीच्या निकालावरून (Bihar Bypoll Results) सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता महाराष्ट्रातही वेग आला आहे. भाजपाचे (BJP) प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीका करत, बिहारच्या निकालाचा आनंद साजरा करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाच्या स्थितीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला.

मंगळवारी भाजपा (BJP) प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बन म्हणाले की, बिहारमधील एका पोटनिवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊत विजयाचा दावा करत आहेत. मात्र ज्या काँग्रेससोबत आणि राष्ट्रीय जनता दलासोबत ते राजकारण करत आहेत, त्या दोन्ही पक्षांनाही अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यामुळे इतरांच्या निकालावर भाष्य करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाच्या स्थितीचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

बन यांनी पुढे सांगितले की, एखाद्या पोटनिवडणुकीच्या निकालावरून भाजपा संपल्याचे निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. भाजपा प्रत्येक निवडणुकीतून शिकत पुढील लढतीसाठी अधिक सक्षमपणे तयारी करतो. गुजरातसह इतर राज्यांतील निकालांचा उल्लेख करत त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची ताकद महाराष्ट्रात कमी झाल्याचा दावा केला.

(हेही वाचा – KDMC नगररचना विभाग वादाच्या भोवऱ्यात; स्वप्नील दळवींच्या नियुक्तीमागे कोण? चर्चांना उधाण)

शिवसेना नाव आणि पक्षाच्या अस्तित्वावर बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची खरी वारसदार असल्याचा दावा केला. विधानसभा, लोकसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जनतेने यालाच कौल दिल्याचे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काहीही असो, जनतेच्या न्यायालयात निकाल स्पष्ट झाल्याचा दावाही त्यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावरही बन यांनी निशाणा साधला. विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेवर टीका करण्यापूर्वी त्यांनी संबंधित नियमांचा अभ्यास करावा, असे सांगत प्रत्येक पक्षाला स्वतःचे बूथ लेव्हल अधिकारी (BLO) नियुक्त करण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रोहित पवार यांच्या मतदारसंघात पक्षाची संघटनात्मक ताकद कमी झाल्याचा दावा करत त्यांनी त्यांच्या टीकेमागे राजकीय अस्वस्थता असल्याचे म्हटले. एसआयआर प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने सुरू असल्याचा पुनरुच्चार करत भाजपा निवडणूक प्रक्रियेत कोणतीही तडजोड करणार नसल्याचे बन यांनी स्पष्ट केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.