रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटी रुपये देणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

131
रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटी रुपये देणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटी रुपये देणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

हिंदवी स्वराज्याची संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५०वा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार किल्ले रायगडावर दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा, या प्राधिकरणाच्या अध्यपदाची जबाबदारी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर सोपवली. तसेच कोस्टल रोडला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यानंतर आमदार भरत गोगावले यांनी केलेली शिवसृष्टी उभारण्याची मागणी मान्य करून त्यासाठी ५० कोटी रुपये देण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

शिवराज्याभिषेकानिमित्ताने शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी रायगडाच्या पायथ्याला शिवसृष्टी उभारण्याची मागणी केली होती. त्या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन दिले. आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावलेंची ही मागणी मान्य करत पहिल्या टप्प्यात ५० कोटी रुपयांची निधी दिला जाईल, असे सांगितले.

(हेही वाचा – शिवराज्याभिषेक सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपले आमदार भरत गोगावले यांनी किल्ले रायगडाच्या खाली शिवसृष्टीसाठी जी ४५ एकर जागा आहे, त्याची मागणी केली होती. त्याला उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री यांनी शिफारस केली. तिजोरीच्या चाव्या तर तुमच्याकडेच आहेत. त्यामुळे भरत शेठ तुमची मागणी मान्य. या शिवसृष्टीला ५० कोटी देण्याचा निर्णय आज आपण घेतोय. ही शिवसृष्टी उभारण्यासाठी पैसे कमी पडणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने, त्याच्या प्रेरणेने त्यांच्या आशीर्वादाने राज्याचा कारभार हाकतोय. म्हणून शिव छत्रपतींच्या स्वप्नातील शिवसृष्टी आपण याठिकाणी साकारण्याचा प्रयत्न करु या, हे देखील मी याठिकाणी सांगू इच्छितोय. शिव छत्रपतींच्या स्वप्नातला सुखी, समृद्ध आणि संपन्न महाराष्ट्र घडवूया हीच आपण शिवचरणी मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतो.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.