Shiv Sena Video : ‘तो’ व्हिडिओ पोस्ट करत सत्तापिपासू उद्धव ठाकरेंचा शिवसेनेने केला जाहीर निषेध

Shiv Sena Video : राहुल गांधी अजूनही द्वेषपूर्ण वक्तव्ये सातत्यपूर्ण करत असताना उद्धव ठाकरे त्या विरोधात एक अक्षरही बोलले नाहीत. उलट राहुल गांधी यांच्या बाजूला बसून सभेला संबोधित करत आहेत, यासाठी नाराजी व्यक्त होत आहे.

241
Shiv Sena Video : 'तो' व्हिडिओ पोस्ट करत सत्तापिपासू उद्धव ठाकरेंचा शिवसेनेने केला जाहीर निषेध
Shiv Sena Video : 'तो' व्हिडिओ पोस्ट करत सत्तापिपासू उद्धव ठाकरेंचा शिवसेनेने केला जाहीर निषेध

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या मणिशंकर अय्यरांविरोधात बाळासाहेबांनी जोडे मारो आंदोलन केले होते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही मागे राहुल गांधी यांना जोडे मारण्याची भाषा केली होती. आता मात्र ‘बेगडी हिंदुत्ववाद्यांचे गळ्यात गळे हातात हात’, अशी टीका करणारा व्हिडिओ शिवसेनेने (Shiv Sena) फेसबूकवर प्रसारित केला आहे. (Shiv Sena Video)

(हेही वाचा – Mahadev Betting App : माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल; एफआयआरमध्ये २१ जणांचा समावेश)

काय लिहिले आहे पोस्टमध्ये ?

ढोंग घेतले खोट्या हिंदुत्वाचे…
साथ धरली हिंदुत्वद्रोह्यांची…
लाज सोडली सत्तेसाठी
तुका ही म्हणे
” नाठाळाचे माथी हाणू काठी ”
कट्टरहिंदुत्ववादी आणि देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जाहीर अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा (Rahul Gandhi) आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या ” सत्तापिपासुंचा” जाहीर निषेध…!

असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. १७ मार्च रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे इंडि आघाडीची प्रचारसभा होत आहे. या सभेत राहुल गांधी यांच्या बाजूलाच उद्धव ठाकरे हेही बसले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये काय आहे ?

या व्हिडिओत राहुल गांधी यांनी केलेली स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या विरोधातील वक्तव्ये दाखवण्यात आली आहेत. तसेच हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांना जोडे मारल्याचे फोटो, उद्धव ठाकरे यांची राहुल गांधी यांच्या विरोधातील वक्तव्ये दाखवण्यात आली आहेत.

राहुल गांधी अजूनही द्वेषपूर्ण वक्तव्ये सातत्यपूर्ण करत असताना उद्धव ठाकरे त्या विरोधात एक अक्षरही बोलले नाहीत. उलट राहुल गांधी यांच्या बाजूला बसून सभेला संबोधित करत आहेत, या बाबत नाराजी व्यक्त होत आहे. (Shiv Sena Video)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.