रामदास कदमांची आमदारकी धोक्यात? काय आहे कारण

त्यामुळे आता रामदास कदम यांची मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाराजी स्पष्ट दिसत आहे.

110

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांवर शिवसेनेचे नेतृत्व नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यामध्ये माजी मंत्री आणि बाळासाहेबांचे क़वे शिवसैनिक असलेल्या रामदास कदम यांचे नाव अग्रणी आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे रामदास कदम यांच्यावर चांगलेच नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता रामदास कदम यांना विधान परिषदेतील आमदारकी वाढवून न देण्याचा पक्षाचा विचार असून त्यासाठी एका नव्या उमेदवाराचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

नव्या उमेदवाराचा शोध सुरू

रामदास कदम यांचा विधान परिषदेतील आमदारकीचा कार्यकाळ जानेवारी 2022 मध्ये संपत आहे. त्यामुळे त्या जागेवर एका नव्या उमेदवाराची वर्णी लागण्याची शक्यता असून रामदास कदम यांना मुदतवाढ देण्यात येणार नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता रामदास कदम यांची मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाराजी स्पष्ट दिसत असल्याचे समजते.

(हेही वाचाः दसरा मेळाव्यात कदमांच्या विरोधात घोषणाबाजी…आधीही आणखी एका सेना नेत्याला झालेला विरोध!)

शिवसैनिकही नाराज

शिवसेना पक्षप्रमुखांसह शिवसैनिक सुद्धा रामदास कदम यांच्यावर चांगलेच नाराज आहेत. नुकत्याच पार पडलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम यांच्या विरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी करुन आपली नाराजी व्यक्त केली होती. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमागे आरोपांचा ससेमिरा लावला आहे. यामध्ये अनेक नेत्यांची नावे आहेत. त्यात परिवहनमंत्री अनिल परब यांच्यामागे लागलेल्या चौकशीच्या फेऱ्यासाठी रामदास कदम यांचाच हात असल्याचा आरोप करण्यात येत होता. याबाबत कदमांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर कदमांवर शिवसैनिक झाले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.