Shivsena Mla Disqualification : अडीच तास चालली शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी, काय झाले नेमके जाणुन घ्या

याबाबतचा निकाल शुक्रवारी,(२०ऑक्टोबर) रोजी विधानसभा अध्यक्ष सुनावण्याची शक्यता आहे.

74
Shivsena Mla Disqualification : अडीच तास चालली शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी, काय झाले नेमके सुनावणीत
Shivsena Mla Disqualification : अडीच तास चालली शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी, काय झाले नेमके सुनावणीत

विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या मुद्यावर गुरुवारी (ShivSena Mla Disqualification) जवळपास अडीचतास ही सुनाावणी झाली.ठाकरे गटाने तीन अर्ज दाखल केले होते त्या अर्जावर सुनावणी झाली. शिंदे गटाच्या वकिलांनी प्रत्येक आमदाराची सुनावणी एकत्रितपणे घ्यावी अशी मागणी केली. तर, ठाकरे गटाच्या वकिलांनी या मागणी जोरदार विरोध केला. आता आमदार अपात्रतेसंदर्भात स्वतंत्र सुनावणी होईल की एकत्रित सुनावणी होईल, याबाबतचा निकाल शुक्रवारी,(२०ऑक्टोबर) रोजी विधानसभा अध्यक्ष सुनावण्याची शक्यता आहे. (Shivsena Mla Disqualification )
याचिका एकत्र करण्याच्या मुद्द्यावर ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. ठाकरे गटातील प्रत्येक वकिलाकडून मुद्देसूद मांडणी करण्यात आली. याउलट शिंदे गटाकडून युक्तिवाद खोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिंदे गटाचे वकील अॅड. अनिल साखरे यांनी म्हटले की, सुनावणी वेळेत होईल यासाठी आमचे संपूर्ण सहकार्य आहे. आमदारांच्या वेगवेगळ्या याचिका असून त्यांची कारणेदेखील वेगवेगळी आहेत. त्यामुळे स्वतंत्रपणे सुनावणी घ्यावी असा मुद्दा मांडला असल्याचे अॅड. अनिल साखरे यांनी म्हटले.

(हेही वाचा : Navratri 2023 : नवरात्र आयोजकांनी मंडपात रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

यामध्ये आमदार अपात्रतेच्या मुद्यावर एकत्र सुनावणी व्हावी, काही अधिकचे कागदपत्रे द्यायचे आहे, कागदोपत्री पुरावा रेकॉर्डवर घ्यावे, ठाकरे गटाला आणखी कायद्याचा किस पाडून वेळ काढला जात आहे.प्रत्येक आमदाराची सुनावणी स्वतंत्र करणे योग्य नाही. त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे वेळकाढूपणा सुरू असल्याचे देसाई यांनी म्हटले. न्यायाला उशीर हा अन्याय केल्यासारखं आहे. सुप्रीम कोर्टातून न्याय मागावा की अशी स्थिती निर्माण झाली असल्याचे संकेतही अनिल देसाई यांनी दिले. शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्र प्रकरणी सुनावणी संपली आहे. अडीच तासाच्या युक्तिवादानंतर सुनावणी संपली. शिवसेनेच्या दोन प्रतिस्पर्धी गटांनी दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यास विलंब होत असल्याचा विरोधकांनी आरोप केला आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.