आजचे सरकार बाळासाहेबांचे स्वप्न होते! संजय राऊतांचा खळबळजनक दावा

109
सध्याचे शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतचे जे सरकार बनले आहे, त्याला बाळासाहेबांचे नक्कीच समर्थन असते. कारण बाळासाहेबांनी अनेकदा शरद पवार यांच्यासोबतच व्यासपीठ शेअर केले आहे. उलट बाळासाहेबांनी अनेकदा सांगितले होते की, राष्ट्रवादीची ताकद आणि शिवसेनेची ताकद एकत्र आली, तर आपण दिल्लीला वाकवू शकतो, असे म्हटले आहे. आता जे काही सरकार स्थापन झाले आहे, ते एकेकाळचे बाळासाहेबांचे स्वप्न होते, बाळासाहेबांची तशी भूमिका होती, असा खळबळजनक दावा करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता जे कुणी गैरसमज निर्माण करत आहेत. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा अभ्यास केला पाहिजे, मी त्यांची शिकवणी घ्यायला तयार आहे. असे सरकार होण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले होते, पण भाजपचे आभार मानले पाहिजे कि त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील सरकार आणण्यासाठी मदत केली आहे, असे म्हटले.
पुण्यात वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने राज्यस्तरीय साखर परिषद २०२२चे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. तेव्हा एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत, मंत्री जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते, त्यांची मुलाखत चित्रलेखा साप्ताहिकाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी घेतली.

…तर भाजपचे सध्याचे उद्योग दिसले नसते

बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मी ३० वर्षे काम केले आहे, त्यांचा प्रभाव माझ्यावर आहेच. बाळासाहेब होते तेव्हा सामनामधून किंवा अन्य माध्यमातून बाळासाहेबांच्या वतीने मीच उत्तरे देत होतो. आताही आमचा पक्ष मोठा असला तरीही एखाद्या विषयावर हिमतीने बोलण्यासाठी जेव्हा मी उभा राहतो तेव्हा बाळासाहेबांची आठवण होते. तेव्हा बाळासाहेबांनी मला काय सांगितले असते, असा विचार येतो. अजूनही तुम्ही सामानाचे अग्रलेख वाचाल, तेव्हा ते बाळासाहेबांचेच विचार वाटतात, म्हणून ते अनेकांना भावतात, आज जर बाळासाहेब असते, तर आज जे काय भाजपचे उद्योग सुरु झाले आहेत, ते झालेच नसते. त्यांची हिंमत झाली नसती. आम्ही त्यांना बाळासाहबांसमोर चळाचळा कापताना पाहिले आहे. मातोश्रीत पाऊल टाकण्यासाठी १० वेळा विचार करायचे, परिस्थिती अजून बदलली नाही. आम्ही जर म्हटले आम्हाला काही गोष्टी दाखवायच्या असतील, तर दाखवू शकतो. पण आमचे सध्याचे नेते सुसंस्कृत आहेत, आम्ही बाळासाहेबांच्या पठडीत तयार झाले आहोत, त्यामुळे आम्ही सुसंस्कृतपणा मानत नाही, अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, तुम्ही ज्या भाषेत बोलाल, त्या भाषेत आम्ही उत्तर देऊ, आमची भाषा प्रभावी आहे, आमची भाषा ठाकरी आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.