CORBEVAX लसीला बूस्टर डोसला आपत्कालीन मंजुरी

113
बायोलॉजिकल ई. लिमिटेड (BE) कंपनीच्या CORBEVAX लसीला आता आपत्कालीन परिस्थितीत कोरोना बुस्टर डोसच्या स्वरुपात वापरण्याची परवानगी दिली आहे. याकरता ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने सहमती दिली आहे. कोविशील्ड किंवा कोव्हॅक्सीन लसीचे दोन्ही डोस घेतलेले १८ वर्ष आणि त्यावरील अधिक वयाचे नागरिक आता आपत्कालीन परिस्थितीत ही लस बूस्टर डोस स्वरुपात घेऊ शकणार आहेत.

८४० रुपयांऐवजी २५० रुपयांना मिळणार बूस्टर डोस 

हैदराबाद स्थिती फार्मास्युटिकल आणि वॅक्सीन कंपनी बायोलॉजिकल ई. लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार CORBEVAX लसीला कोरोनाचा बुस्टर डोस म्हणून वापराला डीसीजीआयने मंजुरी दिली आहे. बीई कंपनीची CORBEVAX लस भारतात निर्मिती करण्यात आलेली पहिली अशी लस ठरली आहे. ज्याला बूस्टर डोस स्वरुपात मंजुरी मिळाली आहे. बायोलॉजिकल ई. लिमिटेड कंपनीने नुकतेच आपल्या कोरोना लस CORBEVAX च्या किमतीत घट केली होती. CORBEVAX खासगी कोरोना लसीकरण केंद्रावर जीएसटीसह ८४० रुपयांऐवजी २५० रुपयांना मिळणार आहे. तर कंज्युमर्ससाठी याची किंमत प्रति डोस ४०० रुपये इतकी असणार आहे आणि यात टॅक्स तसेच अॅडमिनिस्ट्रेशन फी देखील समाविष्ट असणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.