नाशिक गोळीबार प्रकरण: शिंदे गटाच्या नेत्याला अटक

106

नाशिकमधील देवळाली येथे गुरुवारी सायंकाळी शिवसेनाचा ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आला. यावेळी दोन्ही गटातील कार्यक्रर्ते आक्रमक झाल्याने मोठी बाचाबाची झाली. यादरम्यान हवेत गोळीबार करण्यात आला. हा गोळीबार शिंदे गटाच्या समर्थकाच्या मुलाने केल्याचे म्हटले जात होते. आता याप्रकरणीत शिंदे गटाच्या नेत्याला अटक केली असून काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार, सागर किसन कोकणेंच्या तक्रारीच्या आधारावरून शिंदे गटाचे जनसंपर्क प्रमुख राजू लवटचे यांचे पुतणे स्वप्नील सूर्यकांत लवटेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

नक्की काय घडले होते?

गुरुवारी, १९ जानेवारीला सायंकाळी शिवजयंती उत्सव समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पदाधिकाऱ्यांनी बैठकीत गेल्या वर्षाच्या शिवजयंतीच्या वर्गणीचा हिशोब सादर करण्याची मागणी शिंदे गटाचे जनसंपर्क नेते राजू लवटे यांच्याकडे केली. याचा लवटे यांचे पुतणे स्वप्नील लवटेंना राग आला आणि याच रागाच्या भरात त्यांनी अनधिकृत बंदुकीने हवेत गोळीबार केला.

या हवेतील गोळीबारानंतर आजूबाजूच्या परिसरात भयावह वातावरण पसरले होते. आणि पटापट परिसरातील दुकाने बंद करण्यात आली होती. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. पण घटनेनंतर नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

(हेही वाचा – ऐन निवडणुकीच्या तोंडावर NCPच्या विक्रम काळेंच्या विश्वासू सहकाऱ्याने सोडली साथ, भाजपाचा धरला हात )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.