राष्ट्रवादीला खिंडार; आव्हाडांचा विश्वासू नेता शिंदे गटाच्या वाटेवर?

143

मागच्या काही दिवसांपासून शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी असा सामाना रंगला असताना आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे पालिकेचे गटनेते नजीब मुल्ला शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा ठाण्यात लागलेल्या बॅनरवरुन रंगली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे राबोडी विभागाचे माजी नगरसेवक आणि ठाणे महापालिकेचे गटनेते नजीब मुल्ला यांचा शुक्रवारी वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के आणि माझी नगरसेवक राजन केणे यांचा फोटो लावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

( हेही वाचा: ऐन निवडणुकीच्या तोंडावर NCPच्या विक्रम काळेंच्या विश्वासू सहकाऱ्याने सोडली साथ, भाजपाचा धरला हात )

वाढदिवसाच्या बॅनरवर शिंदे गटाच्या नेत्यांचे फोटो

नजीब मुल्ला यांचा 20 जानेवारी, शुक्रवारी वाढदिवस आहे. नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त भल्या पहाटे ठाण्यातील मुंब्रा भागात बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र, या बॅनरवर अजित पवार, जितेंद्र आव्हाड किंवा अन्य कुठल्याही राष्ट्रवादीच्या नेत्याचा फोटो नसून, या बॅनरवर चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के आणि माझी नगरसेवक राजन केणे यांचे फोटो आहेत. त्यामुळे आता नजीब मुल्ला हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगलल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.