Sharad Pawar : शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; सुप्रिया सुळेंनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस आयुक्तांनीही या प्रकरणी कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.

120
Sharad Pawar : शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; सुप्रिया सुळेंनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सतत काहीनाकाही घाडामोडी घडतांना दिसत आहेत. अशातच शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘तुमचा लवकरच दाभोलकर होणार’ अशा शब्दांमध्ये धमकी दिली आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस आयुक्तांनीही या प्रकरणी कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.

(हेही वाचा – Aditya Thackeray : छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदवी स्वराज्य’ आदित्य ठाकरेंना अमान्य?)

मिळालेल्या माहितीनुसार, एका सोशल मीडिया अकाऊंटवरून शरद पवारांना (Sharad Pawar) ही धमकी देण्यात आली असून “तुमचाही दाभोलकर होणार”, अशी पोस्ट या अकाऊंटवर करण्यात आली आहे. तसेच, या धमकीबरोबरच शरद पवारांना अश्लाघ्य भाषेत शिवीगाळही करण्यात आली आहे. यासंदर्भात गृहविभागानं लक्ष घालण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केली आहे.

या धमकी (Sharad Pawar) प्रकरणामुळे राज्यातील राजकारण आता कसं वळण घेईल याकडे जाणकारांचे लक्ष असेल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.