Sandeshkhali Violence : महिलांवर वर्षानुवर्षे अत्याचार करणारा शाहजहान शेख अजूनही फरार; उच्च न्यायालयाने ममता सरकारला फटकारले

181

संदेशखली प्रकरणाबाबत (Sandeshkhali Violence) कोलकाता उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मंगळवारी पश्चिम बंगालच्या ममता सरकारला चांगलेच फटकारले. बलात्कार आणि जमीन बळकावल्याचा आरोप असलेला शाहजहान शेख अद्याप पकडलेला नाही. त्याने केलेल्या गुन्ह्याचे सबळ पुरावे असूनही तो पोलिसांच्या हाताला लागत नाही,  ही गंभीर बाबा आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती टीएस शिवग्ननम आणि न्यायमूर्ती हिरणमय भट्टाचार्य यांच्या खंडपीठाने म्हटले, जर त्याच्यावर हजारो खोटे आरोप आहेत, परंतु यापैकी एकही आरोप खरा असेल तर तुम्ही त्याची चौकशी करा. तुम्ही लोकांना विनाकारण त्रास देत आहात. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या आदेशानंतर भाजप नेते शुभेंदू अधिकारी मंगळवारी संदेशखली येथे पोहोचले आहेत.

(हेही वाचा Doctor Strike : निवासी डॉक्टर गुरुवारपासून जाणार संपावर)

भाजपकडूनही टीका 

संदेशखली येथील महिलांवरील अत्याचार आणि हिंसाचाराच्या (Sandeshkhali Violence) मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय महिला आयोग यांनीही ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही मंगळवारी पश्चिम बंगालमधील परिस्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे हे पतन आहे, असे म्हटले आहे. तसेच याप्रकरणी वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराला अटक केल्यामुळेही टीका करण्यात आली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.