Money Laundering Case: दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज CBI कोर्टाने फेटाळला

102

मनी लाँड्रिग प्रकरणी अटकेत असलेलेल दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने फेटाळून लावला. जैन यांनी जामीन मंजूर करण्यासाठी हा खटल्याचा योग्य टप्पा नसल्याचे सांगत न्या. गीतांजली गोयल यांनी जैन यांना दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे मनी लाँड्रिंग प्रकरणात सत्येंद्र जैन यांना तुरुंगवास भोगावा लागणार आहे.

काय आहे प्रकरण?

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 30 मे रोजी दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांखाली अटक केली. ईडीने यापूर्वी जैन आणि त्यांच्या नियंत्रणाखालील कंपन्यांची 4.81 कोटींची स्थावर मालमत्ता जप्त केली होती. तपास यंत्रणेने राम प्रकाश ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अंकुश जैन, वैभव जैन, नवीन जैन, योगेश कुमार जैन आणि सिद्धार्थ जैन आणि अंकुश जैन यांचे सासरे आणि प्रुडन्स चालवणारे लाला शेर सिंग यांनाही अटक केली आहे. ग्रुप ऑफ स्कूल्स, जीवन विज्ञान ट्रस्टचे अध्यक्ष जी. एस. मथारू आणि जीवन विज्ञान ट्रस्टचे लाला शेर सिंग यांच्या ठिकाणी छापे टाकले. झडतीदरम्यान डिजिटल रेकॉर्ड जप्त करण्यात आले.

सध्या दिल्लीचे आरोग्यमंत्री न्यायालयीन कोठडीत 

न्यायालयाने मंगळवारी सत्येंद्र जैन यांच्या जामीन अर्जावरील निर्णय 18 जूनपर्यंत राखून ठेवला होता. जैन यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार एका प्रकरणात अटक केली होती. जैन यांना त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा जास्त मालमत्तेप्रकरणी अटक करण्यात आली होती. विशेष न्यायाधीश (पीसी ॲक्ट) गीतांजली गोयल यांनी सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) वतीने युक्तिवाद ऐकल्यानंतर जैन यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

(हेही वाचा – 7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दुसऱ्यांदा वाढ होणार!)

मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) तपास सुरू आहे. ईडीचे छापे अजूनही सुरू आहेत. त्यामुळे सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. जैन सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. जैन यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे असलेले सर्व खाते दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना देण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.