Sam Pitroda on Ram mandir : अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणाऱ्या कॉंग्रेसचे सॅम पित्रोदा म्हणतात, हिंदु राष्ट्र निर्माण करायचे कि धर्मनिरपेक्ष राष्ट्र ते ठरवा

Sam Pitroda on Ram mandir : काँग्रेस नेते सॅम पित्रोदा म्हणाले की, धर्म ही वैयक्तिक बाब आहे, त्याचे राष्ट्रीयीकरण करू नका. त्याचा राजकीय फायद्यासाठी वापर करू नका. पंतप्रधान आपला वेळ मंदिरांमध्ये घालवतात. त्यामुळे मला त्रास होतो.

149
Sam Pitroda on Ram mandir : अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणाऱ्या कॉंग्रेसचे सॅम पित्रोदा म्हणतात, हिंदु राष्ट्र निर्माण करायचे कि धर्मनिरपेक्ष राष्ट्र ते ठरवा
Sam Pitroda on Ram mandir : अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणाऱ्या कॉंग्रेसचे सॅम पित्रोदा म्हणतात, हिंदु राष्ट्र निर्माण करायचे कि धर्मनिरपेक्ष राष्ट्र ते ठरवा

पंतप्रधान नेहमीच मंदिरात वेळ घालवत असतात. याचा मला त्रास होतो. त्यांनी शाळा, ग्रंथालये आणि वैज्ञानिक संस्थांमध्ये जावे आणि अनेक मंदिरांना भेट देऊ नये, अशी माझी इच्छा आहे. (Sam Pitroda on Ram mandir) 2024 च्या निवडणुका खूप महत्त्वाच्या आहेत. आपण एका वळणावर आहोत. कोणत्या प्रकारचे राष्ट्र निर्माण करायचे आहे, हे भारतीय लोकांनी ठरवावे. त्यांना हिंदु राष्ट्र (Hindu Rashtra) निर्माण करायचे आहे कि खरोखरच जिथे सर्वसमावेशक विकास होईल आणि जिथे विविधता आणि स्थैर्य यावर भर असेल, असे धर्मनिरपेक्ष राष्ट्र (secular nation) निर्माण करायचे आहे, अशी टीका कॉंग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी केली आहे.

(हेही वाचा – Soumitra Chatterjee : फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार पहिले भारतीय कलाकार सौमित्र चटर्जी)

काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी राममंदिरामुळे देशात जे धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे, त्यावर टीका केली आहे. एका मुलाखतीत सॅम पित्रोदा म्हणाले की, देशात धर्माला खूप जास्त महत्त्व दिले जात आहे आणि त्याबद्दल ते चिंतित आहेत.

म्हणे, धर्म हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय

इंडियन ओव्हरसीज कॉंग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा म्हणाले, “संपूर्ण देश राममंदिर (Rammandir Ayodhya) आणि रामजन्मभूमीच्या विषयात गुंतलेला आहे. त्यामुळे या प्रवृत्तीमुळे मला त्रास होतो. धर्म हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे. त्याला राष्ट्रीय अजेंडा बनवू नये. शिक्षण, रोजगार, विकास, अर्थव्यवस्था, महागाई, आरोग्य, पर्यावरण आणि प्रदूषण हा देशाचा अजेंडा असला पाहिजे. या मूल्यांवर आणि आदर्शांवरच तुम्ही आधुनिक राष्ट्र घडवता, तुम्ही कोणत्या धर्माचे अनुयायी आहात, याची मला पर्वा नाही.”

(हेही वाचा – PM Narendra Modi : … आणि पंतप्रधान मोदी झाले भावूक)

मला काळजी वाटते

या वेळी सॅम पित्रोदा यांनी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, “देशात लोकशाही मूल्ये कमी होत असल्याचे मला दिसते. 10 वर्षे देशाचे पंतप्रधान राहिलेली व्यक्ती जेव्हा पत्रकार परिषद घेत नाही, तेव्हा मला काळजी वाटते. मला असे संकेत मिळत आहेत की, आपण चुकीच्या दिशेने जात आहोत.”

धर्म ही खासगी बाब आहे, त्याचे राष्ट्रीयीकरण करू नका.त्याचा राजकीय फायद्यासाठी वापर करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. (Sam Pitroda on Ram mandir)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.