Ayodhya Ram Mandir IMD : अयोध्येतील हवामानाचे अंदाज कळण्यासाठी स्वतंत्र वेबपेज; भारतीय हवामान विभागाची माहिती

हवामानाची अचूक अद्ययावत माहिती देण्यासाठी आयएमडीने १४० भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये हवामानाचा अंदाज वर्तवण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर केवळ अयोध्येसाठीच नव्हे तर शहराच्या आसपासच्या ठिकाणांचा हवामानाचा अहवाल मिळणार आहे.

148
Ayodhya Ram Mandir IMD : अयोध्येतील हवामानाचे अंदाज कळण्यासाठी स्वतंत्र वेबपेज; भारतीय हवामान विभागाची माहिती

राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा समारंभाला जगभरातील अनेक लोक अयोध्येला भेट देण्यासाठी येणार आहे. हवामानाची अचूक माहिती देण्यासाठी भारतीय हवामान विभागाने अधिकृत संकेतस्थळावर एक विशेष वेबपेज सुरु करण्याचे ठरवले आहे. जेणेकरून बाहेरून येणाऱ्या लोकांना तेथील हवामानाची माहिती मिळाल्याने ते प्रवासाचे नियोजन करू शकतील. ( Ayodhya Ram Mandir IMD )

भारतीय हवामान विभागाने (IMD) २२ जानेवारी रोजी राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा समारंभाच्या आधी जगभरातील अयोध्येला भेट देणाऱ्या भक्तांसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. हवामानाची अचूक अद्ययावत माहिती देण्यासाठी आयएमडीने १४० भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये हवामानाचा अंदाज वर्तवण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर केवळ अयोध्येसाठीच नव्हे तर शहराच्या आसपासच्या ठिकाणांचा हवामानाचा अहवाल मिळणार आहे.यामुळे भाविकांना हवामानाचे अपडेट सहजपणे मिळू शकतील .(Ayodhya Ram Mandir IMD)

(हेही वाचा : Ram Mandir Programme Schedule: अयोध्येत २२ जानेवारी रोजी पाच तास चालणार कार्यक्रम; कसे असेल नियोजन

‘या’ प्रमुख ठिकाणाचा हवामानाचा अंदाज मिळणार 

अयोध्या आणि मिल्कीपूर, मानकपूर, हरय्या, भिटी आणि भानपूर यासारख्या आसपासच्या ठिकाणांचे हवामानाचे अंदाज मिळतील. तसेच, प्रयागराज, वाराणसी, नवी दिल्ली आणि लखनौचे हवामान अहवाल एकाच पानावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तापमान, आर्द्रता, पाऊस आणि इतर गोष्टींसह अयोध्येच्या हवामानाच्या स्थितीचे संपूर्ण चित्र या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

अयोध्येत २२ जानेवारीला हवामानाचा अंदाज
आयएमडीच्या ताज्या अंदाजानुसार, २२जानेवारी रोजी अयोध्येत किमान (रात्र) तापमान 6-8 अंश सेल्सिअस आणि कमाल (दिवस) तापमान १५-१७अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, हा अंदाज शहरात सलग पाच दिवस दीर्घकाळ धुक्याची स्थिती असल्याचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.