पैसे दिले नाही म्हणून सदाभाऊ खोतांना हॉटेल मालकाने रस्त्यातच अडवले!

99
२०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवताना कार्यकर्त्यांना हॉटेलात पार्टी दिली, त्यांना खुश केले, मात्र पैसेच भरले नाही, हा प्रकार तब्बल ८ वर्षांनी उघड झाली. कारण पंचायत राज्य समिती दौऱ्यानिमित्त रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत सांगोला दौऱ्यावर आले. नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांचा गराडा होता. परंतु सदाभाऊ खोत कारमधून खाली उतरताच मांजरी येथील अशोक शिनगारे यांनी त्यांच्या समोर येऊन उभे राहिले आणि त्यांना २०१४ चे हॉटेलचे  बिल आहे ते द्या आणि पुढे जावा, असे म्हणून त्यांना खोत यांना रोखले.

६६ हजार रुपये बिल 

यावेळी सदाभाऊ खोत यांनी ‘तुमचे कसले पैसे मला काही माहीत नाही असतील तर देऊन टाकू’, असे सांगितले. त्यावेळी शिनगारेंनी तुम्ही मंत्री झाल्यावर सुद्धा मला ‘लगा मी आता मंत्री झालो तुझे कसले पैसे मला माहिती नाही’, असे म्हणून अपमानित केले ते काही मला माहित नाही, माझे पैसे द्या असे म्हणून गोंधळ घालू लागला. या गोंधळात सदाभाऊ तिथून कार्यक्रमाच्या ठिकाणी निघून गेले यावेळी रयत क्रांतीचे दीपक भोसले, शंभू माने, भारत चव्हाण प्रा. संजय देशमुख यांनी त्यास समजावण्याचा प्रयत्न केला असता तो तुम्ही मला कोणी समजवायचे नाही, माझे पैसे मला मिळाले पाहिजेत. मी कार्यक्रम संपल्यानंतरही भाऊना पैसे दिल्याशिवाय जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला. अखेर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले. सदाभाऊ यांचे ६६ हजार ४५० रुपये बिल रखडले झाले. मात्र हे पैसे नंतर देतो सांगत ते निघून गेले. तेव्हापासून हॉटेल मालकाला हे पैसे मिळाले नाहीत असा त्यांचा आरोप आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.