संघाला पाठिंबा देणारे तालिबानी मानसिकतेचे! जावेद अख्तर यांचे वादग्रस्त विधान

भारतात काही जण हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडतात. हे लोकही तालिबानी मानसिकतेचेच आहेत, असे जावेद अख्तर म्हणाले.   

89

भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांचे जे समर्थन करतात त्यांची मानसिकता ते तालिबानी प्रवृत्तीचेच आहेत, अशी मुक्ताफळे गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी उधळली आहेत. एनडीटीव्ही या वृत्त वाहिनेला मुलाखत देताना ते बोलत होते.

हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडणारे तालिबानीच! 

यावेळी बोलताना जावेद अख्तर म्हणाले, तालिबानी प्रवृत्ती रानटी आहे. ज्या पद्धतीने तालिबानी हे मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्यासाठी हिंसक प्रयत्न करत आहेत. त्याच पद्धतीने भारतातही काहीजण हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडतात. हे लोकही तालिबानी मानसिकतेचेच आहेत. तालिबानी हिंसक आहेत. रानटी आहेत. पण आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांचे समर्थन करणारे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत, असे जावेद अख्तर म्हणाले.

(हेही वाचा : ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती हरवली! गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी!)

भारतातील काही मुस्लिम तालिबान समर्थक!

भारतातील मुस्लिमांचा एक लहान गट देखील तालिबानचे समर्थन करतोय हे दुर्दैवी आहे. तालिबान आणि त्यांच्यासारखे वागण्याची इच्छा ठेवणाऱ्यांमध्ये एक साम्य आहे. देशातील काही मुस्लिमांनीही अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यावर त्याचे स्वागत केले. हे माझ्यासाठी खूप धक्कादायक होते. भारतातील मुस्लिम तरुण हे चांगले जीवन, रोजगार, चांगले शिक्षण या गोष्टींच्या मागे लागले आहेत. पण मुस्लिमांचा एक गट असाही आहे की, जो स्त्री-पुरुष असा भेदभाव करतो, समाजाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतो. तरीही भारतात कितीही कट्टरतावादी विचारसरणीचे लोक असले तरी भारताचा तालिबान कधीच होऊ शकत नाही. भारतातील बहुतांश लोकसंख्या ही धर्मनिरपेक्ष विचारांची आहे. ते सभ्य असून एकमेकांचा आदर करतात. त्यामुळे त्यांना तालिबानी विचार आकर्षित करु शकत नाहीत, असेही जावेद अख्तर म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.