Rohit Pawar : रोहित पवारांना धक्का! मध्यरात्री २ वाजता मिळाली नोटीस

108
Rohit Pawar : रोहित पवारांना धक्का! मध्यरात्री २ वाजता मिळाली नोटीस

राज्यातील राजकारणात सध्या बऱ्याच गोष्टी घडत आहेत. राज्यातील अनेक घडामोडींना वेग आला आहे. आमदार अपात्रता प्रकरणावरून शिवसेना आणि उबाठा गटात वाद सुरु असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Rohit Pawar) रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बारामतीमधील ॲग्रो या प्लॅन्टवर मध्यरात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने कारवाई केली आहे.

महाराष्ट्र प्रदूषण विभागाने आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना रात्री 2 वाजता नोटीस देत पुढील 72 तासांत प्लांट बंद करण्याची सूचना दिली आहे. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी स्वतः ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

(हेही वाचा – PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली अहमदाबाद येथील सायन्स सिटीला भेट)

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

या सर्व पार्श्वभूमीवर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करत आपलं मत मांडलं आहे. “दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या (Rohit Pawar) कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली. ‘युवा मित्रांना मी एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत, परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत आहे.”

पुढे बोलतांना रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले की; “हा लढा मी लढणारच आहे, परंतु ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे त्यांना एकच सांगायचंय की, मी आधी व्यवसायात होतो नंतर राजकारणात आलो, परंतु आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेले काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारंही नाही.”

आता या प्रकरणामुळे राज्यातील (Rohit Pawar) राजकीय परिस्थितीवर काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.