PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली अहमदाबाद येथील सायन्स सिटीला भेट

144
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली अहमदाबाद येथील सायन्स सिटीला भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवार २७ सप्टेंबर रोजी गुजरातच्या अहमदाबाद येथील सायन्स सिटीला भेट दिली. त्यांनी रोबोटिक्स गॅलरी, नेचर पार्क, एक्वाटिक गॅलरी आणि शार्क टनेलला भेट दिली, आणि यावेळी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनालाही भेट दिली. यावेळी पंतप्रधानांबरोबर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल होते.

या भेटीनंतर ट्विटरवर जारी केलेल्या संदेशात पंतप्रधान (PM Narendra Modi) म्हणाले की, सकाळचा काही वेळ गुजरात सायन्स सिटी येथील चित्ताकर्षक प्रदर्शन स्थळाला भेट देण्यामध्ये व्यतीत केला. रोबोटिक्स गॅलरीपासून सुरुवात केली, या ठिकाणी रोबोटिक्सची अफाट क्षमता अतिशय खुबीने प्रदर्शित केली आहे. तरुणांमध्ये कुतूहल जागे करणारे हे तंत्रज्ञान पाहताना आनंद वाटला.रोबोटिक्स गॅलरी मध्ये डीआरडीओ रोबोट्स, मायक्रोबॉट्स, कृषी रोबोट, वैद्यकीय रोबोट्स, स्पेस रोबोट आणि बरेच काही प्रदर्शित करण्यात आले आहे. या आकर्षक प्रदर्शनांमधून आरोग्य सेवा, उत्पादन आणि दैनंदिन जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची रोबोटिक्सची क्षमता स्पष्ट दिसून येत असल्याचे पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) सांगितले.

(हेही वाचा – Maharashtra Politics : ‘या’ कारणावरून उबाठाच्या चार खासदारांना शिवसेनेच्या भावना गवळींनी बजावली नोटीस)

पंतप्रधान (PM Narendra Modi) म्हणाले की, रोबोटिक्स गॅलरीमधील कॅफेमध्ये रोबोट्सने दिलेल्या चहाचाही आस्वाद घेतला.नेचर पार्क ही गजबजलेल्या गुजरात सायन्स सिटीमधील एक शांत आणि चित्ताकर्षक जागा आहे. निसर्गप्रेमी आणि वनस्पतिशास्त्रज्ञांनी या ठिकाणी भेट द्यायलाच हवी. हे उद्यान केवळ जैवविविधतेला प्रोत्साहन देत नाही, तर लोकांसाठी एक शैक्षणिक व्यासपीठ म्हणूनही काम करते.या ठिकाणच्या पायवाटा बहुविध अनुभव देतात. त्या पर्यावरण संरक्षण आणि शाश्वतता यावर मोलाची माहिती देतात. इथले कॅक्टस गार्डन, ब्लॉक प्लांटेशन, ऑक्सिजन पार्क आणि अशा अनेक जागांनाही जरूर भेट द्या असे आवाहन देखील पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.