सायरस मिस्त्रीनंतर ऋषभ पंत; 2022 मध्ये Mercedes Benz कारचे दोन अपघात

83

भारतीय क्रिकेटचा संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला. दिल्ली-देहरादून महामार्गावर त्याची कार दुभाजकाला धडकली. अपघातानंतर कारने पेट घेतला. सुदैवाने ऋषभ पंत जखमी अवस्थेतच गाडीच्या बाहेर पडल्याने त्याचा जीव बचावला.

Mercedes Benzने प्रवास करत होता 

ऋषभ पंत Mercedes-AMG GLE 43 4MATIC Coupe या गाडीने प्रवास करत होता. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या कारची नोंदणी 25 सप्टेंबर 2019 रोजी झाली होती आणि ऋषभ पंतच्याच नावावर कार आहे. यंदाच्या वर्षातला मर्सिडिज बेंज या महागड्या कारचा हा दुसरा मोठा अपघात आहे. यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे रस्ते अपघातात निधन झाले. मिस्त्री हेही Mercedes Benz GLC 220 D 4MATIC या कारने प्रवास करत होते.

(हेही वाचा शीख धर्मियांचा अवमान केलात, महाराष्ट्राची जनता नोंद ठेवील – मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना इशारा  )

सायरस मिस्त्री यांचा मृत्यू का झाला? 

सायरस मिस्त्री यांची गाडी अनाहित पंडोले चालवत होत्या. त्यांच्या बाजूला त्यांचे पती डेरियस पंडोले बसले होते. तर कारच्या मागच्या सीटवर सायरस मिस्त्री आणि जहांगीर दिनशॉ बसले होते. त्यांनी सीट बेल्ट लावला नव्हता. या दोघांच्या मृत्यूचे हेच मुख्य कारण असल्याचे समोर आले. अनाहित आणि डेरियस यांनी सीट बेल्ट लावला होता, त्यामुळे त्यांचा जीव वाचला.

ऋषभ पंत का वाचला? 

ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी, 30 डिसेंबर रोजी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. आपल्या आईला भेटण्यासाठी तो रुडकीला जात होता. कार चालवताना त्याचा डोळा लागला आणि कार दुभाजकाला  आदळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतची कार डिवायडरला धडकली आणि कारने पेट घेतला. यात कार पूर्णपणे जळून खाक झाली. ऋषभ पंत कारच्या बाहेर पडल्याने त्याचा जीव वाचला. हरियाणा रोडवेजची एक बस त्या मार्गावरुन प्रवास करत होती, त्या बसच्या ड्रायव्हरने ऋषभ पंतला कारबाहेर पडण्यास मदत केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.