सध्या पाकिस्तानची (Pakistan) झोप उडाली आहे, एका बाजूला बलूच नागरिकांनी गृहयुद्ध पुकारले आहे, दुसरीकडे सौदी अरेबियाने पाकिस्तानची साथ सोडली आहे, तुर्कीने पाकिस्तानला आता वाऱ्यावर सोडले आहे, अमेरिकेने भारताशी चांगले संबंध सुरु केले आहे, अशा सर्व आघाड्यांवर Pakistan पुरता हरून गेला असताना भारताशी असलेल्या संघर्षावर कोणता देश मध्यस्थी करेल का, म्हणून इकडे तिकडे पाहत असताना पाकिस्तानने अखेर रशियाला विनवणी केली, मात्र पाकिस्तानला रशियाने सज्जड दम भरला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan) वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, रशियाने स्पष्ट केले की, ते मध्यस्थ म्हणून काम करणार नाहीत. तुमचे वाद तुम्हीच निस्तरा, असे रशियाने म्हटले आहे.
(हेही वाचा Ajit Pawar यांची दशक्रिया आणि उत्तरकार्याची विधी होणार नाही; श्रीनिवास पवार यांनी सांगितले ‘हे’ कारण)
रशियन परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, दोन्ही देशांनी हा वाद द्विपक्षीय पद्धतीने आपसाात चर्चा करून सोडवावा आणि जर एखाद्या देशाने विशेष विनंती केली तरच रशिया यात मदत करेल. एकीकडे दहशतवाद आणि दुसरीकडे चर्चा हा प्रकार एकाच वेळी चालणार नाही असे भारताने पाकिस्तानला (Pakistan) खडसावले आहे. तेव्हापासून पाकिस्तान हा वाद मिटवण्यासाठी मध्यस्थाच्या शोधात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा मध्यस्थीचा दावा केला आहे. पण भारताने हा दावा नेहमीच फेटाळून लावला आहे. दुसरीकडे आता रशियाने मध्यस्थ म्हणून सहभाग नोंदवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे रशियाच्या या विधानाकडे भारतासाठी राजकीय प्रोत्साहन म्हणून पाहिले जात आहे. तसेच पाकिस्तानला (Pakistan) इतर देशांची मदत घेण्याऐवजी संवादाद्वारे तणाव सोडवण्याचा एक मजबूत संदेश दिला जात आहे. रशिया मध्यस्थ म्हणून काम करत नाही. जर यापैकी कोणत्याही देशांनी विनंती केली, तर आम्ही त्यांच्यातील कोणतेही मतभेद सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास नेहमीच तयार आहोत.
Join Our WhatsApp Community


