Hasan Mushrif : महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलकडे ‘इतक्या’ विद्यार्थ्यांची नोंदणी; हसन मुश्रीफ यांची माहिती

विविध प्रकारचे ९६ पॅरामेडिकल अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची कौन्सिलकडे नोंदणी होते.

209
Hasan Mushrif : रुग्णालय प्रशासनात सैन्य दलाच्या माजी अधिकाऱ्यांचा समावेश; हसन मुश्रीफ यांचे सूतोवाच
Hasan Mushrif : रुग्णालय प्रशासनात सैन्य दलाच्या माजी अधिकाऱ्यांचा समावेश; हसन मुश्रीफ यांचे सूतोवाच

वैद्यकिय प्रयोगशाळा तंत्रज्ञान शिक्षण अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलकडे (Maharashtra Paramedical Council) नोंदणी केल्याची माहिती वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी बुधवारी (१३ डिसेंबर) विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विद्यार्थ्यांनी अर्ज केला आणि त्यांची नोंदणी झाली नाही, अशी कोणतीही तक्रार अद्याप प्राप्त झालेली नाही. तथापि, याप्रश्नावर सर्व संबंधितांची बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Hasan Mushrif)

(हेही वाचा – BMC : महापालिकेच्या तीन उपायुक्तांची खांदेपालट)

काँगेसचे बाळासाहेब थोरात यांनी वैद्यकिय प्रयोगशाळा तंत्रज्ञान शिक्षण अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची नोंदणी होत नसल्याबद्दल प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलची (Maharashtra Paramedical Council) स्थापना २०१७ मध्ये झाली. तर नोंदणीची प्रक्रिया २०१९ पासून सुरु झाली. विविध प्रकारचे ९६ पॅरामेडिकल अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची कौन्सिलकडे नोंदणी होते. नोंदणीसाठी अर्ज केला आणि नोंदणी झाली नाही, अशी एकही तक्रार विभागाला प्राप्त झाली नसल्याचे मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सांगितले. (Hasan Mushrif)

(हेही वाचा – Jofra Archer : इंग्लिश क्रिकेट बोर्डाचं म्हणणं धुडकावून लावत जोफ्रा आर्चर पोहोचला लीग खेळायला)

तत्पूर्वी वैद्यकिय प्रयोगशाळा तंत्रज्ञान शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना नोंदणी झाल्याशिवाय व्यवसाय करता येत नाही. त्यामुळे विनातक्रार नोंदणी व्हायला हवी. अनेक ठिकाणी डिएमएलटीचा पदवीधर रक्त तपासणीचे अहवाल देतो. त्यामुळे अहवाल चुकीचा येण्याची शक्यता आहे. या अहवालावर एमडी पॅथॉलॉजिस्टची सही असल्याशिवाय अहवाल देऊ नये, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश टोपे यांनी केल्या. त्यावर यासंदर्भात संंबंधितांना निर्देश देणार असल्याचे मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सांगितले. (Hasan Mushrif)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.