Jofra Archer : इंग्लिश क्रिकेट बोर्डाचं म्हणणं धुडकावून लावत जोफ्रा आर्चर पोहोचला लीग खेळायला

सततच्या दुखापतींमुळे कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह उभा राहिलेला जोफ्रा आर्चर लीग खेळण्यासाठी बार्बाडोसमध्ये पोहोचला आहे

208
Jofra Archer : इंग्लिश क्रिकेट बोर्डाचं म्हणणं धुडकावून लावत जोफ्रा आर्चर पोहोचला लीग खेळायला
Jofra Archer : इंग्लिश क्रिकेट बोर्डाचं म्हणणं धुडकावून लावत जोफ्रा आर्चर पोहोचला लीग खेळायला
  • ऋजुता लुकतुके

सततच्या दुखापतींमुळे कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह उभा राहिलेला जोफ्रा आर्चर लीग खेळण्यासाठी बार्बाडोसमध्ये पोहोचला आहे.(Jofra Archer)

दुखापतीतून नुकताच सावरेला इंग्लिश तेज गोलंदाज जोफ्रा आर्चरने बार्बाडोसमध्ये एक क्लब स्तरावरील सामना खेळून सगळ्यांनाच धक्का दिला. तो या लीगमध्ये खेळणार असल्याचं इंग्लिश बोर्डालाही माहीत नव्हतं. १९ डिसेंबरला आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या लिलावात जोफ्रा आर्चरचा समावेश नाही. आणि इंग्लिश बोर्डाने त्याच्या वारंवार दुखापतग्रस्त होण्याच्या प्रवृत्तीमुळे त्याला आयपीएलमध्ये खेळू नको असा सल्ला दिल्याचं बोललं जात होतं.(Jofra Archer)

(हेही वाचा – Maratha Reservation Ministers Conflict : मराठा आरक्षण विषयावर विधानसभेत मंत्र्यांमधीलच जातिप्रेम उघड)

अशावेळी आर्चर बार्बाडोसमध्ये मात्र लीग खेळण्यासाठीच पोहोचल्यामुळे इंग्लंडमध्येही आश्चर्य व्यक्त होतंय. शिवाय तो खेळलेल्या संघाचे प्रमुख रॉब की यांनीही आपल्याला याविषयी काहीच माहीत नसल्याचं म्हटलं आहे. आर्चर सध्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी इंग्लिश संघाबरोबर वेस्ट इंडिजमध्ये आहे. इथं त्याने सामने खेळणं अपेक्षित नाहीए. तर कोपराच्या दुखापतीतून सावरण्यासाठीच्या रिहॅब कार्यक्रमाचा हा भाग आहे.(Jofra Archer)

अशावेळी अचानक तो बार्बाडोसला जाऊन हा सामना खेळला. त्यानंतर आर्चर आता युकेला परतला आहे. बार्बाडोसमधील सामना खेळण्याच्याच दिवशी आर्चर आणखी एक सामना त्याच दिवशी सकाळी खेळला होता. या सामन्यात त्याने १९ धावा देत चार बळीही मिळवले. पण, महत्त्वाचं म्हणजे तो हे सामने खेळत असल्याचं इंग्लिश संघाचे क्रिकेट प्रमुख रॉब की यांनाही माहीत नव्हतं.(Jofra Archer)

(हेही वाचा – संसदेच्या आवारात निदर्शने करणाऱ्या Neelam ला राजकरणात मारायची आहे ‘एन्ट्री’)

जोफ्रा आर्चर इंग्लंडचा महत्त्वाचा तेज गोलंदाज आहे. पण, मागची दोन वर्षं तो दुखापतीशी झगडतोय. त्याची कोपराची दुखापतही जुनी आणि पुन्हा पुन्हा उद्भवणारी आहे. म्हणूनच इंग्लिश बोर्डाने त्याला आयपीएल दरम्यान विश्रांती घेऊन आगामी टी-२० विश्वचषकासाठी पूर्ण तंदुरुस्त होण्याचा सल्ला दिला होता.(Jofra Archer)

आधीच्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या आर्चरला संघाने लिलावापूर्वी संघातून मुक्त केलं होतं. आता इंग्लिश बोर्डाची त्याच्याविषयी काय भूमिका असेल हे पहावं लागेल.(Jofra Archer)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.