Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha : सिंधुदुर्गातून नारायण राणे महायुतीचे उमेदवार, सामंत यांची माघार 

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha : भाजपाने उमेदवारांची 13 वी यादी जाहीर केली. यात नारायण राणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

117
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha : सिंधुदुर्गातून नारायण राणे महायुतीचे उमेदवार, सामंत यांची माघार 
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha : सिंधुदुर्गातून नारायण राणे महायुतीचे उमेदवार, सामंत यांची माघार 
 रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha) मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार कोण असेल? हा बहुचर्चित प्रश्न सुटला आहे. भारतीय जनता पक्षाने 18 एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या नावाची घोषणा उमेदवार म्हणून केली आहे. यामुळे सर्व चर्चाना आता विराम मिळाला आहे. (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपाला देऊ केली. यानंतर भाजपाने उमेदवारांची 13 वी यादी जाहीर केली. यात नारायण राणे (Narayan Rane) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.  (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha)
शिवसेनेचे मंत्री उदय सामंत (Uday Samantha) यांचे बंधू किरण सामंत (Kiran Samant) येथून लढण्यासाठी आग्रही होते. उदय सामंत यांनी सुद्धा या जागेचा मुद्दा लावून धरला होता. मात्र त्यांची समजूत काढण्यात युतीच्या नेत्यांना यश आले. (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha)
महत्त्वाचे म्हणजे किरण सामंत आणि उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत आपण युतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केलं आहे.  आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यात थेट लढत होणार आहे. (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.