Ramdas Athawale : विरोधकांकडून संविधान बदलण्याबाबत अफवा पसरविण्याचे काम

मंडल आयोगाच्या शिफारशीप्रमाणे मराठा समाजातील गरीब मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे ही मागणी सर्व प्रथम आरपीआयने केली होती असा दावा रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी यावेळी केला.

66
Ramdas Athawale : विरोधकांकडून संविधान बदलण्याबाबत अफवा पसरविण्याचे काम

देशाचे संविधान बदलण्याचा अधिकार कोणालाच नाही, परंतु निवडणूकीच्या तोंडावर विरोधकांकडून भाजपा (BJP) पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलले जाईल अशा प्रकारच्या अफवा पसरवून जनतेत गैरसमज निर्माण करण्याचे काम केले जात आहे. उलट नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यापासून ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात करून संविधानाचा सन्मान वाढविण्याचे काम केले असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी सांगितले. मंगळवारी (१६ एप्रिल), मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात आठवले बोलत होते. यावेळी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, उपाध्यक्ष महेश पवार तसेच सर्व पत्रकार सदस्य उपस्थित होते. (Ramdas Athawale)

संविधान बदलण्यासाठीच भाजपाकडून ४०० पारचा नारा दिला जात आहे, या विरोधकांच्या आरोपावर पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले, काँग्रेस आणि इंडी आघाडीकडून निवडणूकीत मते मिळविण्यासाठी अफवा पसरविल्या जात आहेत. परंतु आता अफवा पसरवून आणि समाजात फूट पाडून मते मिळविण्याचे काँग्रेसचे दिवस गेले आहेत. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यापासून संविधानाचा सन्मान वाढविण्याचे काम केले आहे. नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याच्या दृष्टीने काम सुरु केले आहे, येत्या दीड वर्षात या स्मारकाचे काम पूर्ण होईल. बाबासाहेबांचे लंडनमधील घर खरेदी करून त्याचे संग्रहालयात रूपांतर करण्याच्या दृष्टीने सुद्धा सरकार प्रयत्न करत आहे. विरोधकांकडून मात्र राजकीय हेतूने मोदी सरकारवर खोटे आरोप केले जात असल्याचे आठवले (Ramdas Athawale) म्हणाले. तसेच यावेळी देशात पुन्हा सत्ता मिळवत नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला. (Ramdas Athawale)

(हेही वाचा – Naxalite : मतदानाच्या तीन दिवस आधी नक्षलवादी आणि पोलिस यांच्यात चकमक; नक्षल्यांचा कमांडर ठार)

बाळासाहेबांमुळेच आरपीआय, शिवसेना भाजपा युतीसोबत – आठवले

२०१२ साली बांद्रा येथे रहायला गेलो तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी त्यांना शेजारी नात्याने भेटायला गेलो होतो. तेव्हा बाळासाहेबांनी आपल्याशी दीड तास चर्चा करत शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येण्याची मला साध घातली होती. तेव्हा विचारधारा वेगळी असली तरी काही किमानसमान कार्यक्रमाचे मुद्दे ठरवून आपण बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे शिवसेना-भाजपा युती सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तसेच आरपीआय जेव्हा शिवसेना-भाजपा युती सोबत आली. तेव्हा पासून युतीची महायुती झाली असल्याचे यावेळी आठवले यांनी सांगितले. (Ramdas Athawale)

मी महायुतीसोबत प्रामाणिक

महायुतीच्या जागावाटपात आरपीआय पक्षाला एकही जागा मिळालेली नाहीत त्यामुळे आरपीआय सध्या बॅकफूटवर गेली आहे. मागून आलेला राष्ट्रवादी सारखा पक्ष जागावाटपात पुढे गेला. परंतु नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आपण चार पाऊले मागे घेत राज्यात महायुती आणि केंद्रात एनडीए आघाडीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महायुती अडचणीत असल्याने या कठीण काळात आपण महायुतीसोबत प्रामाणिक राहणार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. (Ramdas Athawale)

वेगळा ओबीसी प्रवर्ग करून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे

मंडल आयोगाच्या शिफारशीप्रमाणे मराठा समाजातील गरीब मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे ही मागणी सर्व प्रथम आरपीआयने केली होती असा दावा रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी यावेळी केला. तसेच तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवून ओबीसी वर्गाचे सध्याचे २७ टक्के आरक्षण कायम ठेवून दुसरा ओबीसी प्रवर्ग तयार करून त्यात मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, असे आठवले म्हणाले. (Ramdas Athawale)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.