Raj Thackeray : वाढत्या उष्म्यामुळे शाळांना सुट्टी द्या

उष्णतेची लाट आली आहे असे जाहीर झाले आहे. मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही? असा प्रश्न राज यांनी हवामान खात्याला विचारला आहे. (Raj Thackeray)

132
Raj Thackeray : वाढत्या उष्म्यामुळे शाळांना सुट्टी द्या

वाढत्या उष्म्यामुळे राज्यातील शाळांना आजच सुट्टी जाहीर करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारला केली. राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान प्रचंड वाढलं आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक्स समाज माध्यमावर पोस्ट करून उन्हाचा त्रास वाढल्याने मुलांच्या शाळांना सुट्ट्या देण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. (Raj Thackeray)

राज ठाकरे (Raj Thackeray) पोस्ट मध्ये म्हणतात की, गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण ह्या भागात दिवसाचे सरासरी तापमान हे जवळपास ४० अंशांपर्यंत गेले आहे. अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाही. उष्णतेची लाट आली आहे असे जाहीर झाले आहे. मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही? असा प्रश्न राज यांनी हवामान खात्याला विचारला आहे. (Raj Thackeray)


(हेही वाचा – Baramati Lok Sabha : बारामतीत चाललंय तरी काय? पवार कुटुंबातीलच आता तिसरी महिला निवडणुकीच्या रिंगणात)

राज ठाकरेंनी केले ‘हे’ आवाहन 

अशा परिस्थितीत लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु व्हायला अजून काही काळ असल्यामुळे त्यांना शाळेत जावे लागत आहे. ह्याबाबतीत, जरी आचारसंहिता असली, तरी सरकारने शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी. तसंच उन्हाळ्याचा दीर्घकाळ शिल्लक आहे, त्यामुळे हवामानात काय बदल होऊ शकतील ह्याचे अचूक अंदाज आले तर एकूणच लोकांना त्यांच्या कामांचे नियोजन करता येईल. (Raj Thackeray)

माझी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना पण विनंती आहे की, तुम्ही पण उष्णतेच्या लाटेत स्वतःची काळजी घ्या. तसंच ह्या भीषण उन्हाळ्यात सगळ्यात जास्त हाल होतात प्राण्यांचे आणि पक्षांचे (राजकीय नव्हेत) आणि निराधार आणि बेघर लोकांचे. त्यांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल ह्याची तजवीज करा आणि प्राणी आणि पक्षी तर बिचारे पाणी मागू शकत नाहीत, त्यामुळे, त्यांना सहज पाणी मिळेल आणि सहज पिता येईल अशा पद्धतीने गॅलरीत, गच्चीत पाणी ठेवा, असे आवाहन राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले आहे. (Raj Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.